राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नगरदेवळा शहर नवनियुक्त कार्यकारणी जाहीर.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१२/०९/२०२१
नगरदेवळा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नवीन पदाधिकाऱ्यांची निवड आज माजी आमदार मा.दिलीपभाऊ वाघ यांच्या आदेशाने व मा.संजयनाना वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.मा.आमदार दिलीपभाऊ वाघ,विधानसभा क्षेत्र प्रमुख नितीनदादा तावडे, तालुकाध्यक्ष विकास पाटील सर,कृ.उ. बा.संचालक रणजित पाटील यांच्या हस्ते नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना निवड पत्र देण्यात आले व त्यांचा सत्कार करण्यात आला.
या निवडीत नवनियुक्त पदाधिकारी पुढील प्रमाणे रामदास तावडे यांची(नगरदेवळा शहराध्यक्ष )पदी, सचिन गढरी(शहर कार्यध्यक्ष) आबा महाजन, रावसाहेब पाटील, अरुण पाटील(वाघदेकर) यांची (नगरदेवळा शहर उपाध्यक्ष) पदी,आण्णा महाजन यांची (शहर सचिव) पदी,बालू लोटन पाटील यांची (शहर मुख्य संघटक )पदी,संदीप परदेशी यांची (शहर चिटणीस)पदी,शरद गढरी यांची (शहर सरचिटणीस) पदी,दादामिया पिंजारी यांची (शहर प्रसिद्धी प्रमुख) पदी,उत्तम समारे पाटील यांची (शहर प्रवक्ता) पदी, प्रकाश धर्मराज परदेशी यांची ओ. बी. सी. सेलच्या नगरदेवळा शहराध्यक्ष पदी व अनिल अभिमन पाटील यांची ओ. बी. सी. सेलच्या शहरउपाध्यक्ष पदी, व सुरेश बागुल यांची सा. न्याय विभाग (नगरदेवळा शहराध्यक्ष) पदी, इब्राहिम पठाण यांची अल्पसंख्याक विभाग (शहर उपाध्यक्ष) पदी सर्वानुमते निवड करण्यात आली.
या प्रसंगी उपसरपंच विलास राजाराम पाटील,मुन्ना काका परदेशी, मोहन नाना तावडे, राकेश बाबा थेपडे, विलास सोनवणे, अशोक सोंनी, कडू आबा पाटील, संजय पाटील, धनराज पाटील, अली रजा, अनुभाई शेख, योगेश महाजन ,रज्जक शेख, सुरेश पहेलवान, ग्रा.प.सदस्य सुनील महाजन,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाउपाध्यक्ष पंकज गढरी,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अभिजित पवार, राष्ट्रवादी युवती काँग्रेसचे तालुकाध्यक्षा अभिलाषा रोकडे,नाना भामरे,आकाश चौधरी, सचिन पाटील,शाहरूख मणियार, स्वीय सहाय्यक गोपी पाटील, त्रिभुवन व पदाधीकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.