पिंपळगाव हरेश्वर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मा.श्री. कृष्णा भोये यांनी केली मडकी फोडण्यास सुरवात.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०२/०९/२०२१
नुकतच गोकुळाष्टमी उत्सव साजरा करण्यात आला गोकुळाष्टमी चे दुसरे दिवशी सुदर्शन चक्रधारी श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्ताने भक्तांनी ठिकठिकाणी दहीहंडी फोडून उत्सव साजरा केला. थोडक्यात दही, दुधाची मटके फोडून गोकुळाष्टमी व गोपाळकाला हा उत्सव पारंपारिक रित्या साजरा मोठ्या उत्साहात साजरा केला.
तसेच आता पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनला नव्याने रुजू झालेले सहाय्यक पोलीस निरीक्षक मा.श्री. कृष्णा भोये यांनी कायद्याचे सुदर्शन चक्र हाती घेत पिंपळगाव हरेश्वर पोलिस स्टेशनच्या हद्दीतील गावठी दारु हद्दपार करण्यासाठी कंबर कसली असून दारूचे मटके फोडण्यास सुरुवात केल्यामुळे पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशन हद्दीतील गावागावातून कृष्णा भोये यांचे अभिनंदन होत आहे.
पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशन हद्दीत मागील दीड वर्षापासून गावागावात मोठ्या प्रमाणात गावठी दारूची निर्मिती व विक्री सुरू होती. यामुळे गावागावात दारुड्यांची संख्या वाढत असल्याने गावात अशांतता पसरली होती. बरेचसे संसार उध्वस्त होत होते तर रोजची भांडणे, कौटुंबिक कलह, अल्पवयीन मुलांमध्ये व्यसनाधीनता वाढत चालली होती हा सगळा प्रकार लक्षात घेऊन गावातील सुज्ञ नागरिक व महिलांनी वारंवार अर्ज फाटे करून सुद्धा दारूबंदी होत नव्हती तसेच नुकत्याच बदलून गेलेल्या सौ.निताजी कायटे यांनी दारूबंदीसाठी प्रयत्न केले होते. परंतु काही ठिकाणी या अवैध दारू विक्री करणाऱ्यांना राजाश्रय मिळत असल्याने पोलिसांचा हेतू साध्य होत नव्हता.
आता नव्यानेच बदलून आलेले मा.श्री. कृष्णा भोये यांनी आठ दिवसापूर्वी पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशन चे सूत्र हाती घेऊन दोन दिवसापूर्वी कुऱ्हाड येथे ग्रामस्थांशी संपर्क साधून छोटेखानी मिटिंग घेतली व या ठिकाणी गावा गावातील गावठी दारू व देशी दारूची अवैध विक्री थांबवण्यासाठी मी प्रयत्नशील असेल असे सांगून ग्रामस्थांच्या सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली होती. त्यानुसार आज मा.श्री. कृष्णा भोये साहेबांनी त्यांच्या सहकाऱ्यांना सोबत घेत अवैध दारू निर्मिती व विक्रीच्या विरोधात धाडसत्र सुरु करुन गावठी दारु निर्मीतीसाठी साठी लागणारे कच्चे रसायन असलेले माठ व टाक्या फोडण्यास सुरुवात केल्यामुळे अवैधधंदे करणारांच्या उरात धडकी भरली आहे.
या कारवाईमुळे सुज्ञ नागरिक व महिलावर्गातून समाधान व्यक्त केले जात असून मा.श्री. कृष्णा भोये यांनी अवैधधंद्याचे विरोधात कडक मोहीम राबवून गावागावातील अवैधधंदे बंद करुन माता, भगिनींचे उध्वस्त होणारे संसार वाचवावेत अशी आपेक्षा व्यक्त केली आहे.
(शेवाळे शिवारात दोन ठिकाणी धाड टाकून हजारो रुपये किंमतीचे गावठी हातभट्टी साठी लागणारे गुळ नवसागर मिश्रीत रसायन नष्ट केल्याची सविस्तर बातमी उद्या)