जळगाव लाचलुचपत विभागाची पाचोऱ्यात कारवाई; दुय्यम निबंधक ज्ञानदेव साहेबराव चव्हाण यांना लाच घेताना रंगेहात पकडले.

दिलीप जैन. (पाचोरा)
दिनांक~२५/०२/२०२१
येथील वरिष्ठ लिपिक तसेच प्रभारी साह्यक दुय्यम निबंधक श्री.ज्ञानदेव साहेबराव चव्हाण वय ४२ संभाजी नगर पाण्याच्या टाकी जवळ ता.पाचोरा जिल्हा जळगाव यांना दिनांक २५/०२/२०२१ रोजी ७०० रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडल्याची माहिती लाचलुचपत विभागाकडून मिळाली असून लाचेचे कारण असे कि, तक्रारदार यांनी पाचोरा न्यायालयात वारस दाखल्याचे प्रकरण दाखल करणेकामी मौजे लोहारी ता.पाचोरा येथील शेत मिळकती व घरमिळकतींच्या एकुण ८ उताऱ्यांचे मुल्यांकन दाखला मिळणेसाठी अर्ज सादर केला असता मुल्यांकन दाखला देण्याच्या मोबादल्यात आलोसे यांनी पंचासमक्ष तक्रारदार यांचेकडे शासकीय फी व्यतिरिक्त ७००/- रूपयांची लाचेची मागणी केली. सदर लाचेची रक्कम स्वतः दुय्यम निबंधक कार्यालय,पाचोरा. ता.पाचोरा जि.जळगाव येथे पंचासमक्ष स्वीकारली असून रोख रक्कम घेण्यात आली असून या संबधीत फोटोग्राफ घेण्यात आले आहेत. या प्रकरणी जळगाव येथील सापळा पथक डी.वाय.एस.पी. गोपाल ठाकुर, पोलीस इन्स्पेक्टर. निलेश लोधी, पोलीस इन्स्पेक्टर.संजोग बच्छाव, सफौ.रविंद्र माळी, पोहेकॉ.अशोक अहीरे, पोहेकॉ.सुनिल पाटील, पोहेकॉ.सुरेश पाटील, पोहेकॉ.रविंद्र घुगे, पोना.मनोज जोशी, पोना.जनार्धन चौधरी, पोकॉ.प्रविण पाटील, पोकॉ.नासिर देशमुख, पोकॉ.ईश्वर धनगर यांनी सदर प्रकरणात सुनील कडासने सो, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक,निलेश सोनवणे सो, अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक,विजय जाधव सो,पोलीस उपअधीक्षक, वाचक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई केली आहे. तसेच या कारवाईच्या अनुषंगाने सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की,त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी कींवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधावा. अँन्टी करप्शन ब्युरो,जळगाव. अल्पबचत भवन, जिल्हाधिकारी कार्यालय आवार, जळगांव @ दुरध्वनी क्रं. ०२५७-२२३५४७७, मोबा.क्रं. ९६०७५५६५५६, टोल फ्रि क्रं. १०६४