मापात पाप करणार पिंपळकोठा येथील कापूस व्यापारी भरत जाधव ट्रक सोडून फरार.
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२८/०३/२०२३
सद्यस्थितीत कापसाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे त्यातच खाजगी कापूस व्यापारी हे मापात पाप करुन शेतकऱ्यांना लुटत आहेत असाच प्रकार आज जामनेर तालुक्यातील मालखेडा गावी उघडकीस आला असुन पिंपळगाव कोठा येथील भरत जाधव नावाच्या वापाऱ्याने मालखेडा गावी कापूस मोजतांना मापात पाप करुन चाळीसगाव किलो वजनामागे दहा ते अकरा किलो जास्त वजनाचा कापूस मोजून घेतांना कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी रंगेहाथ पकडले असता ग्रामस्थांचा संताप पाहून मार खाण्याच्या व पोलिसात गुन्हा दाखल होण्याच्या भितीने संबंधित कापूस व्यापारी भरत जाधव याने कापसाने भरलेला एम. एच. १८, बी. जी. ८५७१ या क्रमांकाचा ट्रक सोडून पळ काढला आहे. परंतु ग्रामस्थांनी कापसाने भरलेला ट्रक अडवून ठेवला आहे.
Download WordPress Themes Nulled and plugins.