बैल शेतात घुसल्याच्या वादातून वाडी येथे एकाचा खुन.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~३०/११/२०२२
पाचोरा तालुक्याती वाडी शेवाळे येथे पुतण्याचा बैल शेतात घुसल्याचा राग येवुन काकाने पुतण्यास तर चुलत काकाने चुलत पुतण्यास काठीने डोक्यात वार केल्याने ४३ वर्षीय पुतण्या हा गंभीर जखमी झाल्यानंतर त्यांना जळगाव येथे गोदावरी हॉस्पीटलमध्ये दाखल केल्यानंतर बुधवारी त्याचेवर उपचार सुरू असतांना त्यांचा मृत्यू झाल्याने पिंपळगाव (हरेश्वर) पोलिस स्टेशनमध्ये खुनाचा गुन्हा दाखल झाला असुन पोलिसांनी मयताच्या चुलत काकाला ताब्यात घेतले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की पाचोरा तालुक्यातील वाडी, शेवाळे येथील प्रल्हाद मोतीराम भोसले व त्याचा पुतण्या पुनमचंद भोसले यांची शेत जमिन शेजारी, शेजारी असल्याने पुनमचंद भावराव भोसले यांचा मुलगा किरण पुनमचंद भोसले यांची बैलजोडी २७ नोव्हेंबर २०२२ रविवार रोजी रोजी दुपारी ४ वाजेच्या दरम्यान प्रल्हाद मोतीराम भोसले यांच्या शेतात घूसल्याचा राग येवुन प्रल्हाद भोसले याने किरण पुनमचंद भोसले यांच्या पाठीत काठीने मारले. तर प्रल्हाद भोसले यांचा मुलगा गणेश भोसले याने पुनमचंद भोसले यांच्या डोक्यात काठीने जोरदार वार केला. यामुळे पुनमचंद हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना अगोदर पाचोरा ग्रामीण रुग्णालयात व नंतर तात्काळ जळगांव येथे उपचारासाठी हलविण्यात आले होते.
दरम्यान २७ नोव्हेंबर रोजी शेतात बैल घुसल्याच्या किरकोळ कारणावरून हाणामारी झाल्याने किरण पुनमचंद भोसले याने चुलत आजोबा प्रल्हाद मोतीराम भोसले व गणेश भोसले यांचे विरुध्द २७ नोव्हेंबर रोजी पिंपळगाव (हरेश्वर) पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र वाघमारे, किरण ब्राह्मणे, अरुण राजपुत यांनी वाडी येथे जावुन गणेश भोसले यास ताब्यात घेतल्यानंतर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने गणेश भोसले ३० नोव्हेंबर पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
याच दरम्यान किरण भोसले याचे वडिल पुनमचंद भोसले यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांचेवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असतांना ३० नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता पुनमचंद भोसले यांचा मृत्यू झाल्याने प्रल्हाद भोसले व गणेश भोसले यांचेवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक महेंद्र वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अमोल पवार हे करित आहेत.
याबाबत वाडी गावातून मिळालेली माहिती अशी की वाडी येथे शेतात बैल घुसल्याच्या शुल्लक कारणावरून शेता शेजारील एका शेतकऱ्याने व त्याच्या मुलाने लाकडी दांडक्याने दिनांक २७ नोव्हेंबर २०२२ रविवार रोजी शेतात बेदम मारहाण केली होती. ही मारहाण करतांना पुनमचंद भावराव भोसले अंदाजे वय ४० हा जागेवरच बेशुद्ध झाला तरीही गणेश प्रल्हाद भोसले व प्रल्हाद मोतीराम भोसले हे बेदम मारहाण करतच होते.
ही वार्ता गावात पोहचताच आसपासच्या शेतातील शेतकऱ्यांनी घटनास्थळी धाव केल्यामुळे मारेकरी फरार झाले होते. या घटनेनंतर जखमी पुनमचंद भोसले याला जळगाव येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. याच उपचारादरम्यान मंगळवार रात्री जखमी पुनमचंद भोसले याचा दुर्दैवाने मृत्यू झाला. ही घटना वाडी गावात माहीत पडताच वाडी, शेवाळे व पंचक्रोशीतील गावागावातून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत पुनमचंद भोसले याच्या मारेकऱ्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी नातेवाईक व पंचक्रोशीतील गावातून केली जात आहे.