पाचोरा शहरात सोशल डिस्टेंसिंगचा फज्जा. कडक अमलबजावणीची गरज.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१०/०९/२०२१
(कांदा कापला म्हणजे डोळ्याला पाणी येत परंतु कांदा कापल्याशिवाय भाकरी गोड लागत नाही.)
याप्रमाणे शिस्त लावतांना थोडाफार जनतेला त्रास होईल मात्र भविष्यातील धोका मात्र टळेल.
कायदा कडक राबवण्याची गरज.
सगळीकडे कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव थांबण्यासाठी शासन, प्रशासन, आरोग्य विभाग दिल्ली ते गल्ली पर्यंत पराकोटीचे प्रयत्न करत असून विशेष म्हणजे आरोग्य विभाग, पोलिस यंत्रणा डोळ्यात तेल घालून चोवीस तास झटत आहे.तसेच लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी, पोलिस विभागाचे वरीष्ठ अधिकारी हे लक्ष ठेवून आहेत.
तरीही कोरोनाचा प्रादुर्भाव थांबत नसल्याने सरतेशेवटी कडकडीत लॉकडाऊचा निर्णय घ्यावा लागतोय ही खेदाची बाब असून याला आपण किंवा आपल्यापैकी काही लोक जबाबदार आहेत.
आज सोमवार दिनांक १० मे रोजी पाचोरा शहरात हेच चित्र दिसून येत होते. सब्जी मंडी, हॉटेल, किराणा दुकान तसेच भररस्त्यावर मोठ्या प्रमाणात गर्दी होती. दैनंदिन व्यवहार पार पाडणे हे जरी गरजेचे असलेतरी प्रत्येकाने आपल्याला कोरोनापासून सुरक्षित रहाण्यासाठी काळजी घेणे गरजेचे होते. व त्याकरिता एकमेव उपाय म्हणजे सामाजिक अंतर राखणे हा आहे.
तरीही आम्ही लॉकडाऊचे सर्व नियम खिश्यात घालून बिनधास्त फीरत आहोत. पाचोरा शहरात नगरपरिषदेचे अधिकारी, कर्मचारी तसेच पोलिस यंत्रणा रात्रंदिवस झटत आहे. तेही आपण सुरक्षित रहावे म्हणून परंतु आम्हाला याची जराही कदर नाही.
आज पाचोरा शहरात जणू यात्राच भरल्याचचा अनुभव येत होता. पाचोरा शहरात सर्वदूर अलोट गर्दि दिसून येत होती. विशेष म्हणजे आम्ही इतके संवेदनश शुन्य झालो आहोत की ॲम्बुलन्स व पोलिसांच्या गाडीचा सायरन वाजल्यानंतर ही आम्ही इंचभर इकडेतिकडे सरकण्याची तसदी घेत न घेता बघ्याची भूमिका पार पाडतांना दिसून येत होतो.
या गर्दीच्या मागचे कारण म्हणजे अक्षय तृतीया व रमजान ईद हे महत्त्वाचे सण येत्या १४ तारखेला आहेत. व या सणानिमित्त खरेदी करण्यासाठी ग्राहकांची एकच गर्दी उसळली असून व्यवसाईंकांनी मनमानीपणे आपले व्यवसाय सुरु केल्यामुळे लॉकडाऊचा फज्जा उडत आहे.
परंतु हे कोरोनासारख्या महामारीच्या आजाराला आमंत्रण देण्यासाठी घातक ठरत असून आता कडक अमलबजावणीची गरज आहे. अन्यथा वेळ आपल्या हातातून निघून गेलेली असेल व आपल्याजवळ पश्चाताप करण्याशिवाय काहीच शिल्लक रहाणार नाही. म्हणून आतातरी प्रांत साहेब, तहसीलदार साहेब, डीवायएसपी साहेब, आमदार साहेब, नगरपरिषद लोकप्रतिनिधी, समाजसेवक यांनी एकत्रित येऊन उपाययोजना राबवल्या पाहिजे असा सूर सर्वसामान्य जनतेतून उमटत आहे.
(सविस्तर बातमी उद्या)