सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • भोजे येथील सावता सॉमिल व संबंधित चौकशी अधिकाऱ्यांविरुद्ध सामाजिक कार्यकर्ते निलेश उभाळे यांची तक्रार.

  • लोहारी येथील दत्त माध्यमिक विद्यालयाचे अध्यक्ष व मुख्याध्यापकांकडून माहिती देण्यास टाळाटाळ.

  • पिंपळगाव हरेश्वर येथे स्वराज पक्षाच्या कार्यकर्त्यावर शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी केला जीवघेणा हल्ला.

  • शेतकऱ्यावर कोसळले अस्मानी संकट, सार्वे पिंप्री शिवारात विज पडून तीन गायी ठार.

  • दत्त माध्यमिक विद्यालयाच्या संस्था चालकाकडून जिल्हापरिषदेला साडे नऊ लाखाचा चुना.

Uncategorized
Home›कृषी विषयक›Uncategorized›

By Satyajeet News
January 21, 2022
85
0
Share:
Post Views: 57
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

[२१/१, १६:२९] सुरेखा जैन: 16:24

Voll 1 12.23 LTE2 KB/S .il 4G+il]

90%

< 7f03aae6-6843-420e-b2... : भारतीय प्रजासत्ताक दिनाचा ७२ वा वर्धापन दिन समारंभ- २६ जानेवारी, २०२२. महाराष्ट्र शासन •सामान्य प्रशासन विभाग, शासन परिपत्रक क्र. सीईआर-२०२१/प्र.क्र.१०८/३०, दिनांक :- २१ जानेवारी, २०२२. राजशिष्टाचार शाखा, ३ रा मजला, मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२. शासन परिपत्रक दिनांक २६ जानेवारी, २०२२ रोजी ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ राज्यभर एकाच • वेळी म्हणजे सकाळी ०९-१५ वाजता आयोजित करण्यात यावा. सदर समारंभ आयोजित करताना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य शासनाने वेळोवेळी दिलेल्या निर्देशांचे तथा सूचनांचे अनुपालन करण्यात यावे. या मुख्य शासकीय समारंभात मर्यादित निमंत्रितांना सहभागी होता यावे, यासाठी या दिवशी सकाळी ८-३० ते १००० च्या दरम्यान ध्वजारोहणाचा किंवा इतर कोणताही शासकीय किंवा अर्धशासकीय समारंभ आयोजित करण्यात येवू नये. जर एखाद्या कार्यालयास अथवा संस्थेला आपला स्वतःचा ध्वजारोहण समारंभ करावयाचा असल्यास त्यांनी तो समारंभ सकाळी ८-३० वा. च्या पूर्वी किंवा १०-०० वा. च्या नंतर करावा. २. जिल्हास्तरावरील कार्यक्रम साजरा करण्याच्या दृष्टीने प्रथेनुसार खालीलप्रमाणे निर्देश देण्यात येत आहे : १. दिनांक २६ जानेवारी, २०२२ रोजी ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ राज्यभर एकाच वेळी म्हणजे सकाळी ०९-१५ वाजता आयोजित करण्यात यावा. सदर समारंभ करताना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने वेळोवेळी दिलेल्या निर्देशांचे तथा सूचनांचे अनुपालन करण्याची जबाबदारी आयोजकांची राहील. या मुख्य शासकीय समारंभात मर्यादित निमंत्रितांना सहभागी होता यावे यासाठी या दिवशी सकाळी ८-३० ते १००० च्या दरम्यान ध्वजारोहणाचा किंवा इतर कोणताही शासकीय किंवा अर्धशासकीय समारंभ आयोजित करण्यात येवू नये. जर एखाद्या कार्यालयास अथवा संस्थेला आपला स्वतःचा ध्वजारोहण समारंभ करावयाचा वाटल्यास त्यांनी तो समारंभ सकाळी ८-३० वा. च्या पूर्वी किंवा १०-०० वा. च्या नंतर करावा. २. विभागीय व जिल्हा मुख्यालयांच्या ठिकाणी संबंधीत पालकमंत्री राष्ट्रध्वजारोहण करतील. तसेच राष्ट्रध्वजारोहण करणारे मा. मंत्री / राज्यमंत्री महोदय काही अपरिहार्य कारणामुळे कार्यक्रमस्थळी वेळेवर पोहचू न शकल्यास विभागीय मुख्यालयी, विभागीय आयुक्त यांनी आणि जिल्हा मुख्यालयी जिल्हाधिकारी यांनी राष्ट्रध्वजारोहण करावे व ध्वजवंदनाचा कार्यक्रम सुरळीतपणे पार पडेल याची दक्षता घ्यावी. तसेच, संबंधित प्रांत अधिकारी व तहसिलदार हे अनुक्रमे जिल्हा उपविभागीय व तालुका मुख्यालये येथे ध्वजारोहण समारंभाच्या ठिकाणी शासकीय कार्यक्रमांचे अध्यक्ष स्थान स्विकारतील. महाराष्ट्र राज्यामध्ये वरील दिवशी सर्व शासकीय व सार्वजनिक इमारतींवर, किल्ल्यांवर, तसेच जिल्ह्यांमध्ये ऐतिहासिक महत्वाच्या ठिकाणी राष्ट्रध्वज उभारण्यात यावेत. ३. दिनांक २६ जानेवारी, २०२२ रोजी मुंबई व नागपूर येथे शासकीय इमारतींवर विद्युत रोषणाई करण्यात यावी. शासन परिपत्रक क्रमांक: सीईआर-२०२१/प्र.क्र.१०८/३०, [२१/१, १६:३०] सुरेखा जैन: ४. राष्ट्रध्वजाला वंदन करताना "जन-गण-मन" हे राष्ट्रगीत वाजविण्यात यावे. ध्वजारोहण समारंभ अध्यक्षस्थान स्वीकारणाऱ्या मान्यवरांनी / अधिकाऱ्यांनी अशा प्रसंगी भाषण करावे किंवा नाही हे स्वतः ठरवावे. सलामीच्या वेळी सज्ज असलेला बँन्ड सलामीपूर्वी व • सलामीनंतर वाजविण्यास हरकत नसावी. ५. राष्ट्रध्वज लावण्याच्या योग्य पद्धतीबाबत शासन परिपत्रक क्रमांक एफएलजी १०९१/३०, दिनांक २ मार्च, १९९१ तसेच क्रमांक एफएलजी-१०९१/(२)/३०, दिनांक ५ डिसेंबर, १९९१ व क्रमांक एफएलजी-१०९८/(ध्वजसंहिता) / ३०, दिनांक ११ मार्च, १९९८ अन्वये दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याची दक्षता घेण्यात यावी. तसेच केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम पार पाडावा. ध्वजारोहणाची रंगीत तालीम घेतली जाईल याची दक्षता घेण्याबाबत सर्व संबंधितांना सूचना द्याव्यात. राष्ट्रध्वज सुस्थितीत असल्याबाबत व सूर्यास्तास उतरवला जाईल याचीही दक्षता घेण्यात यावी. ६. राज्यातील उद्भवलेल्या कोरोना महामारीच्या ३ ऱ्या लाटेचा उद्रेक लक्षात घेता, शासनाच्या महसूल व वन, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभाग यांच्या दि. ८ जानेवारी, (२०२२ रोजीच्या परिपत्रकानुसार सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक व राजकीय सभेकरीता निर्धारित केलेल्या संख्येनुसार निमंत्रितांची उपस्थिती ठेवण्यात यावी. ७. उत्सव अथवा औपचारिक प्रसंगी परिधान करावयाचा राष्ट्रीय पोषाख प्रजासत्ताक दिन समारंभ प्रसंगी उपस्थित राहणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांनी व व्यक्तींनी परिधान करावा असा सल्ला त्यांना मंत्रालयीन विभाग, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी व सर्व संबंधित विभाग / कार्यालय प्रमुख यांनी द्यावा. ८. स्थानिक लोक प्रतिनिधी, स्वातंत्र्य सैनिक, शहिद जवानांच्या पत्नींना व आई-वडील तसेच कोरोनायोध्दा जसे डॉक्टर्स, सफाई कामगार, आरोग्य सेवक यांच्यासह या आजारावर मात केलेल्या काही मर्यादित नागरिकांनाच निमंत्रित करावे. ९. कोरोनाविषाणूची पार्श्वभूमी विचारात घेता, प्रजासत्ताक दिनाचा संपूर्ण कार्यक्रम सामाजिक अंतर (Social Distancing) संदर्भातील सर्व नियम पाळून संपन्न होईल, याची संपूर्ण जबाबदारी आयोजकांची असेल. आयोजकांनी त्यानुसार मान्यवरांना निमंत्रित करण्याची कार्यवाही करावी. समारंभास उपस्थित राहणाऱ्या सर्व व्यक्तींनी राष्ट्रीय पोषाख परिधान करावा. १०. सर्वांसाठी मास्क बंधनकारक आहे. सुरक्षित वावराच्या सर्व नियमाचे काटेकोर • पालन करावे व अधिकाधिक नागरिकांना हा सोहळा घरबसल्या पाहता यावा, यासाठी वेबसाईटद्वारे थेट प्रक्षेपण करावे. ११. दिवसभरातून विविध कार्यक्रम जसे : वृक्षारोपण, आंतर शालेय / आंतर महाविद्यालय यांच्या स्तरावर Online पध्दतीद्वारे वाद-विवाद स्पर्धा, प्रश्नमंजूषा / देशभक्तीपर निबंध व कविता स्पर्धांचे आयोजन करावे. प्रभात फेऱ्या काढण्यात येऊ नये. सांस्कृतिक कार्यक्रम तसेच विविध खेळांचे आयोजन करण्यात येऊ नये. महत्वाच्या योजनेचा शुभारंभ करावा, सोशल • मिडीयाद्वारे निवडक विद्यार्थी विद्यार्थीनींचे देशभक्तीपर गाणे/भाषणे आयोजित करावे, शासकीय इमारतीवर विद्युत रोषणाई करावी, एखादया विषयाचा Webinar आयोजित करावा, एन.एस.एस. व एन. वाय. के. एस द्वारे देशभक्तीपर Online मोहिम राबविण्यात यावी, तसेच सोशल मिडीया व Digital माध्यमाद्वारे देशभक्तीपर किंवा राष्ट्रीय एकात्मते संबंधातील गाण्यांचा प्रचार करावा/संदेश द्यावा, याप्रमाणे प्रजासत्ताक दिन साजरा करण्याच्या दृष्टीने आवश्यक ती कार्यवाही करावी. शासन परिपत्रक क्रमांक: सीईआर-२०२१/प्र.क्र.१०८/३०, पृष्ठ ५ पैकी २ [२१/१, १६:३१] सुरेखा जैन: १२. विभागीय आयुक्त, कोंकण विभाग, पुणे, नागपूर, औरंगाबाद, नाशिक व अमरावती यांनी नवी मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, नाशिक व अमरावती येथे समारंभ करण्याबाबत योग्य ती व्यवस्था सर्व संबंधितांच्या सल्लामसलतीने करावी. १३. विभागीय आयुक्त, पुणे, नागपूर, औरंगाबाद, नाशिक व अमरावती हे त्यांच्या मुख्यालयात ध्वजारोहण समारंभाकरिता योग्य ती व्यवस्था करणार असल्यामुळे जिल्हाधिकारी पुणे, नागपूर, औरंगाबाद, नाशिक व अमरावती येथे या संबंधी वेगळे कार्यक्रम करण्याची आवश्यकता नाही. १४. मा. राज्यपाल हे सकाळी मुंबईत शिवाजी पार्क, दादर, मुंबई येथे प्रमुख कार्यक्रमास उपस्थित राहून ध्वजारोहण करतील. सदर कार्यक्रमामध्ये विविध विभागातर्फे लोकाभिमुख योजनांच्या अनुषंगाने सादर करण्यात येणारे चित्ररथ व पोलीस महासंचालक यांचेकडून दरवर्षी सादर होणारे ध्वजसंचलन यावर्षी रद्द करण्यात यावेत. १५. संबंधित विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांनी त्यांच्या अधिकार क्षेत्रात प्रजासत्ताक दिन समारंभ साजरा करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करावी. त्यांच्या अधिकार क्षेत्रात त्या दिवशी कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सामाजिक अंतराच्या नियमांचे पालन करुन सर्व बाबी योग्य तऱ्हेने कार्यान्वित होतील याबाबत त्यांनी व्यक्तीश: दक्षता घ्यावी. १६. काही ठराविक जिल्ह्यातील कोणत्याही निवडणूकीसंदर्भात आचारसंहिता अंमलात असल्यास सर्व संबंधितांना यासंदर्भात खालीलप्रमाणे सूचना देण्यात याव्यात अ) ध्वजारोहणाच्या नेहमीच्या स्थळामध्ये बदल करण्यात येऊ नये. ब) कार्यक्रमाचा राजकीय व्यासपीठासारखा वापर करु नये. क) मा. पालकमंत्री यांच्या भाषणाचा आशय केवळ ऐतिहासिक पार्श्वभूमी, ऐतिहासिक मान्यवरांचे कार्य आणि कर्तृत्व यापुरतेच मर्यादित असावा आणि त्यांनी कोणतेही राजकीय स्वरुपाचे भाषण करु नये. बलिदान केलेल्या हुतात्मांच्या तसेच देशाचा गौरव यापुरतीच भाषणे मर्यादित असावीत. (उमेश मदन) उप सचिव, महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग तात्काळ क्र. सीईआर-२०२१/प्र.क्र.१०८/३०, सामान्य प्रशासन विभाग, राजशिष्टाचार शाखा, ३ रा मजला, मंत्रालय, मुंबई-४०००३२. दिनांक :- २१ जानेवारी, २०२२. प्रत माहितीसाठी अग्रेषित : मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन २. सर्व अप्पर मुख्य सचिव ३. सर्व प्रधान सचिव / सर्व सचिव, मंत्रालयीन विभाग ४. राज्यपालांचे सचिव, राजभवन, मुंबई, पृष्ठ ५ पैकी ३ शासन परिपत्रक क्रमांक: सीईआर-२०२१/प्र.क्र.१०८/३०, [२१/१, १६:३१] सुरेखा जैन: ५. राज्यपालांचे परिवार प्रबंधक, राजभवन, मुंबई, ६. मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव, मंत्रालय, मुंबई ७. विभागीय आयुक्त कोंकण विभाग, पुणे / नाशिक / नागपूर / अमरावती/ औरंगाबाद ८. प्रधान सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई. ९. सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई १०. प्रबंधक, मूळ न्याय शाखा, उच्च न्यायालय, मुंबई 11. व्यवस्थापक, उच्च न्यायालय, अपील शाखा, मुंबई १२. प्रबंधक, लोक आयुक्त, महाराष्ट्र राज्य यांचे कार्यालय, मुंबई १३. फ्लॅग ऑफिसर कमांडिंग इन चीफ, वेस्टर्न नेव्हल कमांड. मुंबई. 14. जनरल ऑफिसर कमांडिंग, महाराष्ट्र आणि गुजरात विभाग, मुंबई १५. एअर ऑफिसर कमांडिंग, हेडक्वॉटर्स, मेरीटाईम एअर ऑपरेशन्स, आयएएफ, आयएएफ बिल्डींग, धोबी तलाव, मुंबई. १६. पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई १७. स्टेशन कमांडर, इंडियन एअर फोर्स स्टेशन, मुंबई. १८. इतर सर्व मंत्रालयीन विभाग, (मंत्रालयीन विभागाच्या नियंत्रणाखालील सर्व विभाग प्रमुख व कार्यालय प्रमुखांना १९. कळविण्याच्या विनंतीसह) २०. केंद्र संचालक, दूरदर्शन, वरळी, मुंबई नं. ४०००१८ २१. केंद्र संचालक, आकाशवाणी, मुंबई, नागपूर, पुणे, औरंगाबाद. २२. पोलीस आयुक्त, मुंबई, नागपूर, पुणे, औरंगाबाद, ठाणे, सोलापूर, नवी मुंबई. २३. सर्व विभागीय आयुक्त, २४. सर्व जिल्हाधिकारी, २५. आयुक्त, बृहन्मुंबई महानगरपालिका, फोर्ट, मुंबई. २६. महानगरपालिका आयुक्त, नागपूर, पुणे, औरंगाबाद, ठाणे, सोलापूर, कोल्हापूर, कल्याण डोंबिवली, अमरावती, २७. पिंपरी-चिंचवड, नाशिक, नवी मुंबई, उल्हासनगर, नांदेड-वाघाळा, सांगली-मिरज-कुपवाड, अकोला, वसई-विरार, २८. भिवंडी-निजामपूर, मिरा-भाईंदर, अहमदनगर, मालेगाव, जळगाव, धुळे, परभणी शहर, पनवेल, लातूर व चंद्रपूर. २९. सर्व पोलीस उप महानिरीक्षक, मुंबई ३०. महासमादेशक, नागरी संरक्षण दल, मुंबई ३१. जिल्हाधिकारी, मुंबई उपनगर जिल्हा ३२. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषदा ३३. सर्व जिल्हा पोलीस अधीक्षक ३४. महालेखापाल-१ महाराष्ट्र, मुंबई ३५. महालेखापाल-२ महाराष्ट्र, नागपूर ३६. अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई ३७. निवासी लेखापरीक्षण अधिकारी, मुंबई ३८. महासंचालक, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मुंबई ३९. संचालक, सांस्कृतिक कार्य, महाराष्ट्र राज्य, मुंबई ४०. सभापती, महाराष्ट्र विधानपरिषद/उपसभापती, महाराष्ट्र विधान परिषद यांचे खाजगी सचिव ४१. अध्यक्ष, महाराष्ट्र विधानसभा/उपाध्यक्ष, महाराष्ट्र विधानसभा यांचे खाजगी सचिव पृष्ठ ५ पैकी ४ शासन परिपत्रक क्रमांक सीईआर-२०२१/१०८/३०. [२१/१, १६:३२] सुरेखा जैन: 16:25 (Vol) 10.21 LTE2 KB/s •il 4G+ 90% डोंबिवली, अमरावती, २७. पिंपरी-चिंचवड, नाशिक, नवी मुंबई, उल्हासनगर, नांदेड-वाघाळा, सांगली-मिरज-कुपवाड, २८. भिवंडी-निजामपूर, मिरा-भाईंदर, अहमदनगर, मालेगाव, जळगाव, धुळे, परभणी शहर, पनवेल, अकोला, वसई-विरार, लातूर व चंद्रपूर. २९. सर्व पोलीस उप महानिरीक्षक, मुंबई ३०. महासमादेशक, नागरी संरक्षण दल, मुंबई ३१. जिल्हाधिकारी, मुंबई, उपनगर जिल्हा ३२. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषदा ३३. सर्व जिल्हा पोलीस अधीक्षक ३४. महालेखापाल १ महाराष्ट्र, मुंबई ३५. महालेखापाल - २ महाराष्ट्र, नागपूर ३६. अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई ३७ निवासी लेखा परिक्षा अधिकारी, मुंबई ३८. महासंचालक, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मुंबई ३९. संचालक, सांस्कृतिक कार्य, महाराष्ट्र राज्य, मुंबई ४०. सभापती, महाराष्ट्र विधानपरिषद/उपसभापती, महाराष्ट्र विधान परिषद यांचे खाजगी सचिव ४१. अध्यक्ष, महाराष्ट्र विधानसभा/उपाध्यक्ष, महाराष्ट्र विधानसभा यांचे खाजगी सचिव पृष्ठ ५ पैकी ४ शासन परिपत्रक क्रमांक: सीईआर-२०२१/प्र.क्र.१०८/३०, ४२. विरोधी पक्ष नेते विधानसभा / विधानपरिषद यांचे खाजगी सचिव ४३. मुख्यमंत्री यांचे खाजगी सचिव ४४. मुख्यमंत्री यांचे जनसंपर्क अधिकारी, मुंबई ४५. सर्व मंत्री / राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव ४६. कार्यकारी अभियंता, इलाका शहर विभाग, बांधकाम भवन, मुंबई ४७. कार्यकारी अभियंता, बांधकाम विभाग - १, मुंबई ४८. कार्यकारी अभियंता, बांधकाम विभाग - २, मुंबई ४९. कार्यकारी अभियंता, मध्य मुंबई विद्युत विभाग / दक्षिण मुंबई विद्युत विभाग, मुंबई ५०. संचालक, उपवने व उद्याने, बांधकाम भवन, मुंबई ५१. संचालक, क्रिडा व युवक सेवा सेंट्रल बिल्डींग पुणे.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Previous Article

पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी पुन्हा ठरले जगातील ...

Next Article

आज जळगाव जिल्ह्यात आढळले तब्बल ४१४ बाधीत ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • Uncategorizedआपलं जळगाव

    समग्र शिक्षा अभियानाचे दोन कर्मचारी जखमी अतिरिक्त पदाच्या कर्तव्यासाठी जातांना झाला अपघात.

    December 24, 2020
    By Satyajeet News
  • Uncategorized

    जळगाव जिल्ह्यात बर्ड फ्लूचा शिरकाव होवू नये याकरीता यंत्रणानी दक्ष रहावे . -जिल्हाधिकारी अभिजीत राऊत.

    January 11, 2021
    By Satyajeet News
  • Uncategorized

    अंबे वडगाव येथील गावठी दारु विरोधात पोलीसांची कारवाई, गावठी दारू विक्रेत्याची खुलेआम शिवीगाळ

    September 1, 2022
    By Satyajeet News
  • Uncategorizedराजकीय

    गाव करील ते राव काय करील, चिंचपुरे ग्रामपंचायत ठरणार बिनविरोध.

    December 31, 2020
    By Satyajeet News
  • Uncategorized

    शेंदुर्णीत भाजपाच्या नगरसेवकावर विनयभंगाचा गुन्हा दाखल.

    August 31, 2021
    By Satyajeet News
  • Uncategorized

    ग्रामीण पत्रकारांच्या करुण सत्यकथा.पत्रकार मा.श्री.डी. एस.डोने यांच्या लेखणीतून.

    November 19, 2021
    By Satyajeet News

You may interested

  • आपलं जळगाव

    कळमसरा येथील मयताचे कुटुंबाला, जिल्हापरिषद सदस्य दिपकभाऊ राजपूत यांच्याकडून पाच हजाराची मदत.

  • Uncategorized

    देवसिंग चव्हाण यांचे दुःखद निधन.

  • क्राईम जगत

    कळमसरा येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारांना कठोर शासन झालेच पाहिजे, जामनेर राष्ट्रीय चर्मकार संघाची मागणी.

दिनदर्शिका

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज