पाचोरा+भडगाव तालुक्यातील आदिवासी बांधवांसाठी विविध योजना मार्गदर्शन शिबीर
दिलीप जैन.(पाचोरा)
पाचोरा येथे दिनांक १२ नोव्हेंबर गुरुवार या दिवशी सकाळी ११वाजता राजीव गांधी टाऊन हॉल जामनेर रोड येथे आमदार मा.श्री.किशोरआप्पा पाटील. यांच्या अध्यक्षतेखाली एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत विविध विकास योजना मार्गदर्शन शिबीर मा.सौ.विनिता सोनवणे (प्रकल्प अधिकारी सो एकात्मिक आदिवासी विकस प्रकल्प यांच्या तर्फे आयोजित करण्यात आले आहे.
पाचोरा व भडगाव तालुक्यातील आदिवासी बांधवांचा विकास व्हावा या हेतूने या शिबिराचे आयोजन करण्यात आले असून या शिबिरात उपविभागीय कार्यकारी अधिकारी पाचोरा विभाग पाचोरा मा.श्री. राजेंदजी कचरे साहेब यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभणार असून मा.श्री. केलास चावडे सो (तहसीलदार पाचोरा),मा.सौ.एम.एस.आंधळे(तहसीलदार भडगाव),मा.श्री. अतुल पाटील.(गटविकास अधिकारी पंचायत समिती पाचोरा),मा.श्री. आर.ओ.वाघ.(गटविकास अधिकारी पंचायत समिती भडगाव),मा.सौ.शोभाताई बाविस्कर(मुख्याधिकारी न.पा.पाचोरा),मा.श्री. विकास नवाडे(मुख्याधिकारी न.पा.भडगाव),मा.श्री. सुधाकर वाघ(जिल्हाध्यक्ष एकलव्य संघटना, जळगाव),मा.श्री. सिंकदर तडवी.(माजी पंचायत समिती सदस्य पाचोरा) हे उपस्थित राहणार आहेत.
तरी लाभार्थींनी येतांना जातीचा दाखला, रेशन कार्ड, आधार कार्ड, मतदान कार्ड,रहिवासी दाखला, शेतीचा ७/१२उतारा,२ पासपोर्ट फोटो, बँकेचे बचत पासबुक इत्यादी आवश्यक कागदपत्रे घेऊन उपस्थित रहावे व या शिबिराचा लाभ घ्यावा असे अवाहन आयोजकांनी केले आहे