ओला दुष्काळ जाहीर करुन सरसकटपणे नुकसान भरपाई द्या कॉग्रेसची मागणी.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२८/०७/२०२२
यावर्षी जून महिन्याच्या सुरवातीला पावसाने हुलकावणी दिली मात्र त्यानंतर पाचोरा तालुक्यात पावसाची संततधार सुरू आहे. या संततधार पावसामुळे कोळपणी, निंदनीय, फवारणी व खत देणे खोळंबल्याने पिकांची पाहिजे तशी वाढ झाली नसून सूर्यप्रकाश न मिळाल्याने पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. तसेच सततच्या संततधार पावसामुळे सूर्यप्रकाश न मिळाल्याने पिके पिवळी पडून मुळ सडून पानगळ होत आहे. यामुळे शेतकऱ्यांनी घेतलेले महागडे बियाणे, खते, नांगरटी, वारकरी, पेरणी, फवारणी यावर केलेला खर्च सुद्धा हातात येणार नसल्यासारखी परिस्थिती लक्षात घेऊन आज पाचोरा कॉग्रेसच्या वतीने तालुकाध्यक्ष सचिन सोमवंशी यांच्या नेतृत्वाखाली पाचोरा तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करुन सरसकट अनुदान देण्यात यावे याकरिता पाचोरा तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले आहे.
यावेळी पाचोरा तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी, शहर अध्यक्ष ॲडव्होकेट अमजद पठाण, युवक जिल्हा उपाध्यक्ष अंबादास गिरी, ओबीसी तालुका अध्यक्ष इरफान मनियार, शहराध्यक्ष शरिफ शेख, महिला जिल्हा काँग्रेसच्या जिल्हा सरचिटणीस संगिता नेवे, कुसुम पाटील, सुनिता पाटील, कल्पना निंबाळकर, अमजद मौलाना, शिवराम पाटील, सय्यद ईसुफ टकारी, बिस्मिल्ला टकारी, शंकर सोनवणे, ललित पुजारी, जलील शहा, कल्पेश येवले, राहुल शिंदे आदींनी धरणे आंदोलन मध्ये उपस्थित होते.