हिंम्मते मर्दा, तो मददे खुदा. कुऱ्हाड खुर्द येथील ६५ वर्षीय बाबांची कोराना वर यशस्वी मात.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१९/०४/२०२१
‘हिंम्मते मर्दा,तो मददे खुदा’
म्हणजे आपण हिंमत दाखवली तर देव सुध्दा मदत करतो। मर्द हा शब्द भलेही पुरुषांसाठी असला तरी, हिंमत शब्द सगळ्यांसाठी सारखा आहे. कोणीही हिंमत केली तर त्याचा विजय निश्चितच होतो यात शंका नाही.
असेच एक उदाहरण कुऱ्हाड खुर्द तालुका पाचोरा येथील रहिवासी श्री.मोतीलाल दौलत गायकवाड वय ६५ वर्षे यांनी खरे करुन दाखवले.
श्री.मोतीलाल गायकवाड हे पंधरा दिवसांपूर्वी प्राथमिक आरोग्य उपकेंद्र कुऱ्हाड येथे कोरोना बाधित आढळून आले होते.
डॉक्टरांनी त्यांना औषध उपचार देऊन विलगीकरण राहण्याचा सल्ला दिला होता. त्यांनी त्यास होकार देत तब्बल पंधरा दिवस शेतात विलगीकरण पद्धतीने राहून गोळ्या औषध उपचार वेळोवेळी घेऊन त्यांनी या कोरणा सारख्या गंभीर आजारावर मात केली.
ते या आजारावर मात केल्याचा अनुभव देखील व्यक्त करतात की एखादा रुग्ण बाधित आढळून आल्यास त्याने न घाबरता,औषध उपचार वेळेवर घ्यावीत व विचार सकारात्मक ठेवून यातून लवकर बरे होता येते.
असा मोलाचा सल्ला त्यांनी आज गावकऱ्यांना दिला. आज पुन्हा पंधरा दिवसानंतर त्यांची रॅपिड चाचणी केल्यानंतर त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला. या आजारातून तसेच नियमांचे पालन करून बरे झाल्याबद्दल लोहरा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. देवेंद्र पाटील, समुदाय वैद्यकीय अधिकारी श्री एमुद्दिन शेख, आरोग्य सेवक श्री आर.के. राठोड पत्रकार सुनील लोहार ,दीपक पाटील,गोपाल पाटील ,सुभाष राठोड व आशा स्वयंसेविका यांनी त्यांचे टाळ्या वाजवून स्वागत केले.