कोरोना विषयी जनजागृती करतांना अंबे वडगावचे तंटामुक्ती अध्यक्ष श्री. पितांबर कोळी.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२३/०२/२०२१
सगळीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. शासन, प्रशासन यंत्रणा युद्ध पातळीवर प्रयत्न करत आहेत. परंतु कोरोनाचा सामना करण्यासाठी फक्त शासनाने प्रयत्न करायचा व आपण मनमानी करायची विशेष म्हणजे शिकलो सवरलो तरीही त्या शिक्षणाचा उपयोग न घेणे हे कितपत योग्य आहे असे मत पाचोरा तालुक्यातील अंबे वडगाव येथील तंटामुक्ती अध्यक्ष पितांबर कोळी यांनी व्यक्त केले.
पितांबर झेंडू कोळी हे गरिब कुटुंबातील व्यक्ती परंतु लहानपणापासून आध्यात्माचे वेड लागलेली व्यक्ती गावात वयाच्या सातव्या वर्षापासून भजन, भारुड म्हणत रंगमंचावर भुमिका गाजवणारे तसेच व्यसनमुक्ती, अंधश्रद्धा निर्मूलन, जातीय सलोखा, प्रत्येक महापुरुषांच्या जयंती, पुण्यतिथी, ग्रामस्वच्छता अभियान, अश्या अनेक कार्यक्रमाव्दारे समाजसेवा करणारे व्यक्तीमत्व व यांनी आज कोरोना विषयावर जनतेला केलेली विनंती.