मीना समाज महासभा महिला जिल्हाध्यक्षपदी निशाताई महेर यांची बिनविरोध निवड.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१८/०६/२०२१
अखिल भारतीय मिना समाज महासभा या संघटनेची महिला कार्यकारिणी गठीत करण्यात आली असून त्यात निशाताई महेर यांची अखिल भारतीय मीना समाज महासभा संघटनेच्या जळगाव जिल्हा महिला अध्यक्षपदावर बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
अखिल भारतीय मिना समाज महासभा या संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रमेश जोनवाळ यांच्या आदेशानुसार महिला कार्यकारिणी गठीत करण्यात आली असून संघटनेच्या जळगाव जिल्हा महिला अध्यक्षपदी निशाताई महेर यांची निवड करण्यात आली आहे.
त्यांच्या निवडीबद्दल संस्थापक अध्यक्ष नाहरसिंग सत्तांवन, मोहरसिंग सलावद, प्रदेश अध्यक्ष रमेश जोनवाळ, सुभाष डोभाल, दिपक डोभाळ, गोपाल चन्नावत, दिनेश शिहरा, कैलास टाटू, दिनेश शिहरा यांच्या उपस्थितीत सपनाताई धनावत, शोभाताई जोनवाल, संगीताताई कायटे, योगिताताई चेडवाळ, जयश्रीताई शिहरा, निशाताई महेर, छायाताई जोनवाळ, वर्षाताई कायटे यांनी अभिनंदन करुन निशाताई महेर यांचा सत्कार करण्यात आला. निशाताई महेर यांच्या निवडीबद्दल सर्व समाज बांधवांनी अभिनंदन केले आहे.