गावठी डुकरांचा उच्छाद, शेतातील हरभरा व दादरचे पिक फस्त शेतकऱ्याचे दोन लाखाचे नुकसान.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०३/०२/२०२१
पाचोरा तालुक्यातील अंबे वडगाव येथील दिव्यांग शेतकरी दिलीप फुलचंद जैन. यांची गावाजवळच पाचोरा ते जामनेर रस्त्यावर गट नंबर १५/१ शेत जमीन आहे.
या शेतजमिनीत जैन यांनी हिवाळी पिक हरभरा व दादर पेरलेली आहे. पिकाची वेळेवर पेरणी, खुरपणी, निंदणी, फवारणी व खते वापरून चांगल्याप्रकारे देखभाल असल्याने हरभरा व दादरचे पिक जोमदार आले होते.
मात्र शेतजमीन गावाजवळ असल्याने व गावात प्रमाणापेक्षा जास्त गावठी डुकरे असल्याने या डुकरांनी जैन यांच्या शेतातील हरभरा व दादर या हिरव्यागार पिकावर हल्ला चढवून पिक नष्ट केले विशेष म्हणजे शेताला काटेरी कुंपण असल्यावरही व डुकरांना हाकलण्यासाठी वेळोवेळी रोजंदारीवर राखोळी करूनसुद्धा रात्री बे रात्री डुकरांनी शेतातील हरभरा व दादर नष्ट केल्याने बि बियाणे, खते, मजूरी, शेती मशागत व इतर झालेला खर्च व हरभरा, दादर चे अपेक्षित उत्पन्न व यापासून मिळणारा चारा मिळून अंदाजे दोनलाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
नुकसानभरपाई मिळावी म्हणून नुकसानग्रस्त शेतकरी डुकरांचा मालक आंबादास जाधव याचे विरोधात लवकरच रितसर तक्रार दाखल करणार आहे.
अंबे वडगाव गावात गावठी डुकरांची संख्या मोठ्या प्रमाणात असून गाव हगणदारीमुक्त झाले असल्याने तसेच सांडपाण्याच्या गटारी भुमिगत असल्याने या गावात आता डुकरांची भुख भागत नसल्याने ही गावठी डुकरे शेतकरी वर्ग घरी नसतांना गावातील घरात घुसून घरातील धान्य फस्त करत आहेत. तसेच लहान मुलांच्या अंगावर धाऊन जात चावा घेत आहेत.
त्यांची भुख भागत नसल्याने हि डुकरे स्वताच्याच पिलांना मारून खात आहेत. तसेच गावठी कुत्रे या डुकरांची शिकार करत असल्याने डुकरे व कुत्र्यांना रक्ताची चटक लागल्याने ते माणसांना व गल्लीत फिरणाऱ्या लहान लहान मुलांना चावा घेत आहेत.
या गावठी डुकरांचा बंदोबस्त व्हावा म्हणून ग्रामपंचायतीने पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशन पासून तर जिल्हा कार्यालयापर्यंत अर्जफाटे केलेले आहेत परंतु तरीही हा डुकरांचा मालक कुणालाही जुमानत नसून डुकरांची तक्रार करणारांना जिवे मारण्याची किंवा (जातियवाचक शिविगाळ केल्याची) ॲट्रॉसिटीचा गुन्हा नोंद करण्याची धमकी देत असल्याने अंबे वडगाव ग्रामस्थांपूढे मोठा पेच निर्माण झाला आहे.
आता ग्रामीण भागातील महिला या दिवसात वडे, पापड, कुर्डया तसेच दाळी बनवतात मात्र गावात डुकरे जास्त असल्याने महिलांना खुपच त्रास सहन करावा लागतो म्हणून डुकरांचा बंदोबस्त करण्यासाठी महिला लवकरच जिल्हाकार्यालया समोर उपोषणाला बसणार असल्याचे महिला सांगतात तरी यि गावठी डुकरांचा त्वरित बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी जोर धरत आहे.