चारचाकी व दुचाकीची चाबी अल्पवयीन मुलामुलींच्या हाती अपघातात वाढ, कुटुंबप्रमुख हरवल्याची पोलिसांनी व्यक्त केली खंत.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१५/०४/२०२२
सद्यस्थितीत स्वयंचलित दुचाकी व चारचाकी वाहनांच्या च्याब्या लहान, लहान मुलामुलींच्या हातात दिसून येत असून ही अल्पवयीन मुले व मुली पाचोरा शहरासह तालुक्यातील खेडेगावातील रस्त्यावर तसेच महामार्गावर आपल्या ताब्यातील वाहने भरधाव वेगाने पळवतांना दिसून येत आहेत.
विशेष म्हणजे १२ वर्षांपासून तर १६ वर्षे वयाची अल्पवयीन मुले व मुली रस्तावर आपल्या ताब्यातील स्वयंचलित वाहने भरधाव वेगाने पळवतात ही वाहने पळवतांना त्यांना वाहतुकीची नियमावली व कायदे माहीत नसल्याने सर्व नियम व कायदे खिशात घेऊन रस्ता आपल्या बापाचाच असल्याचे समजून रस्त्यावरुन चालतात. तसेच या अल्पवयीन लहान, लहान मुला, मुलींना आपली दुचाकी उभी करतेवेळी जमीनीवर पाय पोहचत (पुरत) नसल्याने आपल्या ताब्यातील दुचाकी थोड्याफार प्रमाणात झुकती करावी लागते किंवा गाडीच्या सीटवरुन उभे राहून जमीनीवर पाय टेकवण्यासाठी प्रयत्न करावे लागतात व यायच तोल जाऊन रहदारीच्या भर रस्त्यावर ते गाडीसहीत पडतात.
याच कालावधीत जर मागाहून किंवा समोरुन वाहन येत असल्यास अपघात होऊन जीवितहानी होते किंवा हातपाय गमवावा लागतो व असे अपघात झाल्यानंतर लहान, लहान मुलांची चुक नजरेआड करत शिस्तबद्ध पध्दतीने चालणाऱ्या वाहनधारकांना नहाकच अनेक संकटांना सामोरे जावे लागते. म्हणून अश्या अल्पवयीन वाहनचालकांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी ही कारवाई करतांना त्यांच्या पालकांना जबाबदार धरुन त्याच्यावरही दंडात्मक कारवाई करण्यात यावी असे मत सुज्ञ नागरिकांनी व्यक्त केले आहे.
कुटुंबप्रमुख हरवल्याची खंत
*****************
सद्यस्थितीत गाडी, बंगाल व इतर सुखवस्तू आपल्याजवळ असणे हा प्रतिष्ठेचा विषय समजला जातो. म्हणून की काय थोड्या, थोड्या कामांसाठी वाहने वापरली जातात. तसेच कोणत्याही कामाला जातांना वेळेवर न जाता ऐनवेळी निघून भरधाव वेगाने वाहने पळवली जातात तर दुसरीकडे लहान, लहान मुलामुलींना अल्पवयातच वाहन चालवण्यासाठी शिकवले जाते. व आमची लहान, लहान मुले दुचाकी, चारचाकी वाहने सहज चालवून घेतात अशी बढाई मारुन शेखी मिळवून घेतांना बरेचसे पालक दिसून येतात. मात्र हे करत असतांना याच्यापासून होणारे दुष्परिणाम नजरेआड केले जातात व यामुळे कधीही न भरुन निघणाऱ्या नुकसानीला सामोरे जावे लागते हे मात्र निश्चित.
म्हणून कुटुंबप्रमुख आपल्याजवळ आलेल्या सुखसुविधांचा वापर हा अनाठायी करुन सामाजिक व स्वताची जबाबदारी विसरून वागतात असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. असे मत सुज्ञ नागरिक व काही कायद्याच्या रक्षकांनी सत्यजित न्यूजकडे व्यक्त करत कुटुंबप्रमुखच हरवला असल्याची खंत व्यक्त केली आहे.