गॅस, पेट्रोल, डिझेल दरवाढीविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी तर्फे आंदोलन.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२२/०८/२९२१
गॅस पेट्रोल व डिझेल या जीवनावश्यक वस्तूंची वारंवार होणारी दरवाढ व या दरवाढीमुळे जनसामान्यांच्या जीवनावर होणारे दुष्परिणाम लक्षात घेऊन जळगाव जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला आघाडी तर्फे जळगाव येथे भाववाढीच्या विरोधात आंदोलन करण्यात आले.
हे आंदोलन राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या ग्रामिण सौ. वंदनाताई चौधरी वमहानगरध्याक्ष
सौ. मंगलाताई पाटील यांच्या नेतृत्वाखाली गॅस दरवाढ विरोधात आंदोलन घेण्यात आले.
शास्त्री टाॅवर चौकात आंदोलनाची सुरुवात झाली.गाडीवर सिलेंडरला हार घालून व चुल मांडून, सरपंच व गोवऱ्या ठेवून व वाद्याच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. घोषणा देत शिवाजी पुतळ्याजवळ मिरवणूक चे विसर्जन करण्यात आले
गॅस दरवाढ विरोधात केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला तसेच फायर ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांना राखी बांधून कृतज्ञता व्यक्त केली यावेळी जिल्हाध्यक्ष आ. अॅड. भैय्या साहेब रविंद्रजी फाटली, उपाध्यक्ष वाल्मिकमामा, विधानसभा क्षेत्र श्री राजेश भाऊ पाटील, जिल्हा सरचिटणीस अशोक भाऊ पाटील, कार्याध्यक्ष श्री विलास भाऊसाहेब पाटील अल्पसंख्याक अध्यक्ष मजहर पठाण, रिजवान खाटिक , अनिरुद्ध जाधव, रहीम तडवी, मिडीया प्रमुख सलीमभाईजी महीला आघाडी पदाधिकारी श्रीमती मिनाक्षी चव्हाण, कल्पिता पाटील युवती जिल्हाध्यक्ष, आशाताई येवले, , सौ. सुमनताई बनसोडे, सौ. मनिषा देशमुख, रयसाबी पटेल, संगिता भामरे, सुनिता सुर्यवंशी, सीमा राॅय, उषा नेवे , सुवर्णा सोनवणे, निशा निंबाळकर, सुचेता ताई, पूजा पाटील, सुशीलकुमार शिंदे, विशाल देशमुख व अनेक पदाधिकारी उपस्थित होते.