तोंडावर मास्क नसलेल्या वाहन धारकांना इंधन देऊ नये.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२२/०२/२०२१
सर्वदूर कोरोनाचा कहर सुरु असून शासन, प्रशासन पराकोटीचे प्रयत्न करत असतांनाच सर्वसामान्य जनता प्रतिसाद देतांना दिसून येत आहे.
मात्र दुसरीकडे काही लोक कोरोनाचा विषय गांभिर्याने घेत नसल्याचे दिसून येते. अजूनही बऱ्यापैकी विनामस्क फिरणारांची संख्या कमी नाही.
यातच दुचाकी वाहन चालक घराबाहेर पडतांना मास्क वापरतांना दिसून येत नाहीत. तसेच हे स्वताचे वाहन असल्याने काही कामानिमित्त तर काही फक्त फिरण्यासाठी बाहेरगावी जातात व अनेकांच्या संपर्कात येऊन परत गावाकडे जातात तरीही यांच्या तोंडाला मास्क नसतो.
म्हणून पेट्रोल पंपावर इंधन भरण्यासाठी आलेल्या वाहन धारकांना तोंडाला मास्क असल्याशिवाय त्यांना इंधन देऊ नये अश्या सुचना पेट्रोल पंप मालक व चालकांना केल्यास नक्कीच फायदा होईल असे सुज्ञ नागरिकांचे मत आहे.
तरी माननीय जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक साहेबांनी अश्या सूचना दिल्यास खुपच महत्त्वाचे होईल.