तुझे आहे तुजपाशी परी तु जागा चुकलाशी. शासन, प्रशासनाला का ठरवतात हो दोशी.

बेजबाबदार जनताच कोरोना रुग्ण वाढीसाठी जबाबदार ? (पत्रकार मा.श्री. राहुल महाजन पाचोरा.)
जनतेपुढे प्रशासन हतबल….पाचोरा प्रशासनाच्या वतीने कठोर निर्णय घेण्याची वेळ…..नाहीतर पाचोऱ्यात पुन्हा होणार लॉकडाऊन?*
महाराष्ट्रासह सध्या स्थितीमध्ये जळगाव जिल्ह्यातील पाचोरा शहराची परिस्थिती बघता-बघता दिवसेंदिवस कोरोना सदृश्य होत असून याकडे प्रशासन तसेच लोक प्रतिनिधी यांनी गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. मागील आठवड्यापासून कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढत असून पाचोरा शहरातील कोरोना रुग्णांची संख्या वाढली असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. यामध्ये पाचोरा शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांकडून हलगर्जीपणाचा कळस बघायला मिळत असून कुठेही नियमांचे पालन होत नाही.असे दिसून येत आहे.
लग्न समारंभ,राजकीय कार्यक्रम,पार्ट्या मोठ्या प्रमाणावर होत आहेत यावर सर्वदूर १०० टक्के बंदी घालणे गरजेचे आहे. लॉक डॉउन लावून कुठल्याही व्यापारी वर्गाचे नुकसान होईल हा शासनाचा हेतू नाही परंतु नागिरकांनी कोरोना सदृश परिस्थिती लक्षात घेता शहरातील बाजारपेठ,शाळा,महाविद्यालय,मंगलकार्यालय, गर्दीचे ठिकाणे तसेच सार्वजनिक ठिकाणे मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असेल अश्या ठिकाणावर बंधने घालणे सक्तीचा विषय बनला असून तालुक्यातील प्रशासन, पोलीस अधिकारी,लोक प्रतिनिधी,सामाजिक कार्यकर्ते,जेष्ठ समाजसेवक,पत्रकार या सगळ्यांनी मिळून कोरोना परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करणे आता महत्वाचे असून यावर कठोर निर्णय घेणे गरजेचे आहे.
या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता प्रशासनाकडून कठोर पाऊले उचलली नाही गेली तर शहरात पुन्हा लॉकडाउन होणार यात कुठलीही शंका नाही.
🛑आज ग्रामीण भागामध्ये परिस्थितीचा आढावा घेतला असता लग्न समारंभ मोठ्या धुमधडाक्यात होत असून यावर अंकुश ठेवणे गरजेचे आहे. प्रवाशी वाहतूक करत असतांना कुठेही सोशल डिस्टेनसिंग पाळले जात नाही. एसटी बसेस भरगच्च भरून प्रवासी वाहतूक करतांना दिसून येतात.,शहरातील लग्न सराई मुळे बाजारपेठ गजबजलेल्या असून मंदीच्या फेऱ्यात भरडला जात असलेल्या व्यापारी वर्गाला जरी आर्थिक संकटातून मोकळा स्वास घेता येत असला तरी मात्र कोरोनासारख्या संकटात अटकून पुन्हा जनतेचा श्वास या परिस्थितीमध्ये पुन्हा गुदमरुन जाणार यात मात्र शंका नाही.
सामाजिक जीवन जगत असतांना अश्या या छोट्या छोट्या कारणाने पुन्हा कोरोना डोके वर काढायला लागला आहे. प्रशासनाकडून नागरिकांमध्ये वेळोवेळी जागृती करून देखील सुद्धा लोक काही सुधारण्याचे नाव घेत नाहीये यामध्ये प्रशासन देखील जनतेपुढे हतबल होतांना दिसून आले असून हा देखील मोठा चिंतेचा विषय आहे. आता मात्र(लातो के भुत, बातोसे नही मानते) हे गृहीत धरून कठोर पावले उचलण्याची गरज आहे.
पाचोरा येथील प्रांतधिकारी मा.श्री. राजेंद्रजी कचरे साहेब, मा.श्री. कैलासजी चावडे साहेब, डी.वाय.एस.पी. मा.श्री. भारतजी काकडे साहेब, पाचोरा पोलीस स्टेशनचे नजन पाटील. साहेब व यांचे सहकारी तालुक्यातील गावागावात व पाचोरा शहरात जास्तीत जास्त नियंत्रण ठेवण्यासाठी प्रयत्न करीत आहेत मात्र यामध्ये नागरिकांकडून सहकार्याची अपेक्षा असून लग्न समारंभ,कार्यक्रम यामध्येच मोठ्या प्रमाणावर कोरोनाचा शिरकाव होण्याची शक्यता असल्याने नागरिकांना प्रशासनाच्या वतीने जाहीर आवाहन करण्यात येते कि लग्न समारंभ मध्ये कमीत कमी लोकांना बोलवा सोशल डिस्टसिंग ठेवा, मास्क वापरा, सॅनिटायझर चा वापर करा व प्रशासनाला सहकार्य करा असे त्यांनी सांगितले आहे.
(तुझे आहे तुजपाशी पण तु जबाबदारी भुललाशी)
आता विचार तुम्ही करा माय बाप जनता हो,,,,,अजून देखील परिस्थिती आटोक्यात येऊ शकते….एकदा आलेली वेळ पुन्हा कधी येत नाही असे नेहमी म्हणतात पण आता आपणच त्याला कारणीभूत ठरणार असून येऊन गेलेली वेळ पुन्हा येऊ शकते यासाठी सोशल डिस्टसिंग पाळा…..सॅनिटायझरचा नियमित वापर करा आणि कोरोना टाळा…..
असे आवाहन शासन, प्रशासन, आरोग्य विभाग, आजी,माजी, खासदार, आमदार, जिल्हापरिषद, पंचायत समिती सभापती, उपसभापती, सदस्य व सुज्ञ नागरिकांनी केले आहे.