प.पू.प.म.आचार्य प्रवर श्रीयेळमकर नवे बाबाजी यांच्या महंती वर्षपूर्ती निमित्त अभिष्टचिंतन सोहळा संपन्न..

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१६/०३/२०२१
पाचोरा तालुक्यातील अंबे वडगाव येथील पारिमांडल्य महानुभाव आश्रमाचे संचालक परम पुज्य परम महंत महाराष्ट्राधिकरण १०८ आचार्य प्रवर गुरुवर्य श्रीमोठे बाबाजिंच्या आत्यंतिक प्रसन्नतेने परम महंत श्री.चक्रपाणी बाबा उपाख्य ई.श्री.रविराज शास्त्री येळमकर यांना श्रीयेळमकर प्रतिष्ठा आजच्याच दिवशी म्हणजेच १६ मार्च २०२० रोजी प्रदान करण्यात आली होती.
दिनांक १६ मार्च २०२१ रोजी एक वर्ष होत असल्याचे औचित्य साधून प.पू.प.म.आचार्य प्रवर श्रीयेळमकर नवे बाबाजी
यांच्या महंती वर्षपूर्ती निमित्त अभिष्टचिंतन सोहळा साजरा करण्यात आला याप्रसंगी प.पू.प.म.आचार्य प्रवर श्रीअशनाख्य भोजने बाबाजी (नवे) यांच्या प्रमुख उपस्थितीत प.पू.श्री.शिवराज दादाजी विद्वांस, प.पू.श्री.अर्जुनराज दादाजी धाराशिवकर, प.पू.श्री.बाळकृष्ण दादाजी धाराशिवकर यांनी मोठे बाबाजींना शाल, श्रीफळ, पुष्पहार देऊन सन्मानित केले.