पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनकडून जाहीर सुचना.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१७/०१/२०२१
पाचोरा तालुक्यातील ९६ ग्रामपंचायतीची मतदान प्रक्रिया पूर्ण झाली असून उद्या पाचोरा येथे मतमोजणी होणार आहे.
म्हणून कायदासुव्यवस्थेकामी
*पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व ग्रामपंचायत निवडणुकितील पॅनल प्रमुख, उमेदवार यांना सूचना आहे.
उद्या मतमोजणी असून
१)विजयी उमेदवार यांनी कुठल्याही प्रकारची मिरवणूक काढायची नाही.
२) सध्या जळगाव जिल्ह्यात महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७(१)(३) ची अमल बजावणी चालू आहे.त्यामुळे DJ किंवा साउंड बॉक्स लावून / बँड लावून मिरवणूक काढणे, उगाच पराभूत उमेदवार यांचे गल्लीत/ घरासमोर जाऊन फटाके वाजवणे, गुलाल उधळणे असे वर्तन/प्रकार कटाक्षाने टाळावेत. ३) जो कोणी असे प्रकार करील व त्यावरून भांडणे होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास सर्वस्वी त्यांना जबाबदार धरून कारवाई करण्यात येईल.
४) तसेच पराभूत उमेदवार यांनी देखील पराभव स्विकारुन कोणत्याही प्रकारचा खोडकर पणा न करता कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी.
५) निवडणुकीत विजय आणि पराभव होत असतो त्यामुळे त्याचा सर्वांनी आनंदाने स्विकार करावा. व गावातील सामान्य नागरिकांना त्याचा त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी ही विनंती .*
*सर्वांना उद्याच्या निकालासाठी शुभेच्छा*
नीता कायटे
*पोलीस निरीक्षक*
*पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशन*