राजकारण सोडून शेतकरी संघटीत झाला, तरच शेतकरी टिकेल. शेतकरी संघटनेचे नेते सुनील देवरे.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२६/०३/२०२३
प्रत्येक गाव, खेड्यात जातीपातीचे राजकारण उभे करुन शेतकऱ्यांना राजकीय पटलावर अडकवून ठेवत स्वताची पोळी भाजून घेण्यासाठीचे कटकारस्थान केले जात असल्याने शेतकरी वेगवेगळ्या पक्षांच्या दावणीला बांधले गेले आहेत. आजपर्यंत सगळ्याच पक्षांनी सत्तेत येण्याची शेतकऱ्यांना अनेक आश्वासन दिली मात्र सत्ता मिळताच मी तो नव्हेच अशी भूमिका घेत असल्याचे दिसून येत आहे. म्हणून जर शेतकऱ्यांना खरोखरच न्याय मिळवून घ्यायचा असेल तर राजकीय जोडे बाजूला ठेवून जातीपातीच्या राजकारणात न अडकता व वेगवेगळ्या पक्षाचे झेंडे हातात घेऊन फिरण्यापेक्षा आता आपण स्वतंत्रपणे हातात शिंगाडे घेऊन रस्त्यावर उतरले पाहिजे तरच शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास होईल अन्यथा भविष्यात शेतकरी टिकू शकणार नाही. म्हणून आता शेतकऱ्यांनी फक्त आणि फक्त शेतकरी म्हणून लढले पाहिजे असे प्रतिपादन महाराष्ट्र शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा राष्ट्रीय अध्यक्ष शेतकरी नेते सुनील देवरे यांनी एरंडोल तालुक्यातील खडके खुर्द येथील महाराष्ट्र शेतकरी संघटनेच्या शाखा स्थापनेच्या कार्यक्रम प्रसंगी केले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात गावाचे जेष्ठ मार्गदर्शक पी. जी. पाटील सर यांनी सांगितले की शेतकऱ्यांचं संघटन व्यवस्थित रित्या होत नसल्याने व दिशाहीन पद्धतीने होत असल्याने त्यांनी महाराष्ट्र शेतकरी संघटनेच्या माध्यमाने व शेतकरी नेते सुनील देवरे यांच्या नेतृत्वात व सानिध्यात एका छत्रछायेखाली येऊन सर्वांगीण पद्धतीने संघटन करणे आवश्यक आहे असे सांगितले. यावेळी उपस्थित मान्यवरांचा गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला तर गावाचे सरपंच तुकाराम पाटील, उपसरपंच अशोक पाटील, माजी सरपंच साहेबराव पाटील, आनंदा पाटील, पोलिस पाटील चंद्रकांत पाटील,गावातील नितीन पाटील, ईश्वर पाटील, इंद्रसिंग पाटील, अर्जुन पाटील, अनिल पाटील, विठ्ठल सोळंकी, वेडू पाटील, योगेश पाटील, निलेश पाटील, ज्ञानेश्वर पाटील, विलास पाटील, अमरसिंग राजपूत, रामचंद्र पाटील, नाना पाटील यांच्या सह सर्व आजी माजी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, वि.का. सोसायटी चेअरमन, सदस्य व जेष्ठ नागरिक, युवा वर्ग उपस्थित होते.
याप्रसंगी महाराष्ट्र शेतकरी संघटनेची खडके खुर्दे गावात शाखा स्थापन करण्यात आली. शाखेचे मार्गदर्शक म्हणून पी.जी.पाटील सर,शाखाध्यक्ष सुनील वेडू पाटील,कार्याध्यक्ष म्हणून विलास गुलाब पाटील,माहिती प्रमुख म्हणून सागर गोकुळ पाटील, उपाध्यक्ष म्हणून अर्जून अशोक पाटील,संपर्क प्रमुख म्हणून नामदेव संतोष पाटील, खजिनदार म्हणून आकाश तुकाराम पाटील उपस्थितांचे आभार सुनील पाटील यांनी मानले.