एच.डी.एफ.सी.एस.सी.सेंटर तर्फे जागतिक महिलादिन उत्साहात साजरा.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०८/०३/२०२१
पाचोरा ह्युमन डेव्हलपमेंट फाउंडेशन व सी.एस.सी. सेंटर येथे जागतिक महिलादिना निमित्त पाचोरा तालुक्यातील उद्योजक महिलांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी पाचोरा तहसीलदार कैलास चावडे, सी.एस.सी. डिस्ट्रिक्ट मॅनेजर गजानन पाटील, संस्थेचे चेअरमन गोकुळ सोनार , डॉ. तेजस्विनी गवळी आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉ.तेजस्वीनी गवळी यांचा सन्मान करण्यात आला. होमिओपॅथी च्या माध्यमातून डॉ गवळी या गेल्या अनेक वर्षापासून पाचोरा व परिसरातील नागरिकांना खूप चांगल्या प्रकारे वैद्यकीय सेवा देत आहेत. ह्युमन डेव्हलपमेंट फाउंडेशन च्या एच आर सौ. क्रुष्णा बोरूडे यांचा सत्कार करण्यात आला. बॅंकिंग ऑपरेटर शिल्पा शिरसाठ, महिला उद्योजक प्रतीनीधी मनिषा पाटील, वैशाली वाघ यांचा सत्कार करण्यात आला.
तहसीलदार चावडे साहेबांनी महिलांना स्री पुरुष समानतेवर मार्गदर्शन केले. सी एस सी डि. एम. गजानन पाटील यांनी महिलांना उद्योजकतेवर मार्गदर्शन केले. याप्रसंगी पाचोरा तालुक्यातील लघुउद्योजक महिला तसेच भरत पाटील, सचिन पाटील, प्रविण घारु, पप्पू दाभाडे, प्रियंका बाविस्कर, रविंद्र मराठे, गणेश पाटिल, चंदन पारोचे, मयुर जगताप, मुकेश तांबे आदी उपस्थित होते.