अंबे वडगाव व सावखेडा गाव शिवारात पिसाळलेल्या कुत्र्याचा उपद्रव.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१७/०१/२०२१
पाचोरा तालुक्यातील अंबे वडगाव व सावखेडा गाव शिवारात पिसाळलेल्या कुत्र्याने धुमाकूळ घातला असून आतापर्यंत शेतात बांधलेल्या बऱ्याच पाळीव गायी, म्हैस, बैल व वासरांना चावा घेतला असून आसपासच्या गावात हा कुत्रा घुसल्यास परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते.
कारण आतापर्यंत अंबे वडगाव येथील शरद लोटन वाघ यांच्या मालकीची एक गाय व एक गोऱ्ह्याला कुत्र्याने चावा घेतला असून अंबे वडगाव येथीलच सागर गोविंदा डांबरे यांच्या मालकीच्या गोऱ्ह्याला चावा घेतल्याने गोऱ्हा पिसाळला व त्यात त्याचा मृत्यू झाल्याने शेतकऱ्याचे अंदाजे पंधराहजार रुपयाचे नुकसान झाले आहे.
अंबे वडगाव गावपरीसरात बेवारस कुत्र्यांची संख्या जास्त असून गावात कुत्री व डुकरांचा उपद्रव वाढला आहे. याबाबतीत वारंवार तक्रारी करुनही काहीएक उपयोग होत नसल्याने ग्रामस्थ व पशुपालक चिंतेत आहेत.