नगरपंचायत निवडणुकीत प्रहार जनशक्ती पक्षाच्या यशाचा जळगावात जल्लोष, महानगर युवक आघाडीने पेढे वाटून व्यक्त केला आनंद
निलेश बोरा.(जळगाव)
दिनांक~१९/०१/२०२२
बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर नगरपंचायत निवडणुकीत १७ पैकी १२ व लातूर जिल्ह्यातील चाकुर नगरपंचायत निवडणुकीत १७ पैकी ६ जागा व यवतमाळ जिल्ह्यात बाभूळगाव नगरपंचायत निवडणुकीत १ जागा जिंकत दमदार कामगिरी करणाऱ्या बच्चुभाऊ कडू प्रणित प्रहार जनशक्ती पक्षाच्या यशाचा जल्लोष पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जळगावात साजरा केला.
राज्यमंत्री बच्चुभाऊ कडू प्रणित प्रहार जनशक्ती पक्षाने नेहमीच शेतकरी,कष्टकरी,कामगार, महिला व अपंग आदी शोषित वंचित घटकांच्या न्याय हक्कांसाठी लढा दिला आहे. पक्षाच्या वतीने बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर नगरपंचायत निवडणुकीत १७ पैकी १२ जागा जिंकत दमदार कामगिरी केली आहे. मराठवाड्यातील लातूर जिल्ह्यातील चाकुर नगरपंचायत निवडणुकीत सुध्दा १७ पैकी ६ जागा जिंकून मराठवाड्याच्या राजकारणात एन्ट्री केली आहे. यवतमाळ जिल्ह्यात बाभूळगाव नगरपंचायत निवडणुकीत सुद्धा पक्षाचे उमेदवार निवडून आले आहेत.
पक्षाचा विचार सामान्य माणसापर्यंत पोहचविण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे राज्य कार्याध्यक्ष-बल्लू जवंजाळ,बुलडाणा जिल्हा प्रमुख-वैभवराजे मोहिते,पक्ष निरिक्षक-गजानन लोखंडकार यांनी विशेष संघटन बांधणी केली. त्यामुळे प्रहार पक्षाला राज्यात पार पडलेल्या विविध निवडणुकीत चांगले यश मिळत आहे.
जळगाव शहरात प्रहार जनशक्ती युवक आघाडीचे शहराध्यक्ष निलेश बोरा,सागर गवळी, लक्ष्मण पाटील, हरीश कुमावत, जितेंद्र वाणी,धनंजय आढाव,अनिल बिऱ्हाडे,समाधान पवार,गोपीचंद मराठे;गणेश माळी,मो.इकबाल काकर,अभिजित बाविस्कर, ॲड. प्रदीप जी.सोनवणे,दिलीप शिंपी,समीर सोनवणे,हरीश अंभुरे,राजू पाटील,योगेश देशमुख,कमलाकर इंगळे,मोहन माळी, आदी कार्यकर्त्यांनी पेढे भरवून पक्षाच्या यशाचा जल्लोष साजरा केला. यावेळी आगामी जळगाव शहर महानगरपालिका निवडणुकीत पक्षाचे उमेदवार सर्व जागांवर उभे करून त्यांना निवडून आणण्याचा संकल्प प्रहारच्या कार्यकर्त्यांनी यावेळी निर्धार व्यक्त केला आहे.