पाचोरा येथे कॉग्रेसच्या उच्च स्तरीय समितीचा दौरा, कॉंग्रेसच्या तालुकाध्यक्ष पदि सचिन सोमवंशी यांची निवड.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२१/१२/२०२०
कॉंग्रेस पक्षाने नुकतीच एक उच्चस्तरीय समिती गठीत केली असून या समिति ने पाचोरा येथे येउन आढावा घेतला. पाचोरा तालुक्यातील कॉंग्रेस पक्षाचे धडाडीने काम करत असलेले सचिन सोमवंशी यांची तालुका अध्यक्ष पदासाठी एकमताने निवड करून तसा ठराव करण्यात आला.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस चे अध्यक्ष ना. बाबासाहेब थोरात यांच्या आदेशानुसार जळगाव जिल्हा अध्यक्ष अॅड. सदीप पाटील यांच्या निर्देशानुसार एक उच्च स्तरीय समिति गठित करण्यात आली. या समिती मध्ये मुख्य समन्वयक भागवतराव सुर्यवंशी समन्वयक मनोज पाटील, मुन्नाजी शर्मा, के. डी. चौधरी यांचा समावेश होता. समितीच्या पदाधिकाऱ्यांनी पाचोरा शहर व ग्रामीण कॉंग्रेस पक्षातील कामाचा आढावा घेतला यात वेगवेगळ्या आंदोलन,यांचा आढावा घेतला शहर अध्यक्ष अॅड अमजद पठाण यांनी शहराची कामगिरी सांगितली तर तालुका सरचिटणीस प्रताप पाटील यांनी तालुक्याचा आढावा दिला. या बैठकीत नुतन तालुका अध्यक्ष साठी इच्छुकांची नावे घेण्यात आली यावेळी राजेंद्र महाजन, किशोर गरुड, सचिन सोमवंशी यांचे नावे आल्यावर समिती ने तिघा इच्छुकांना एकत्र बसुन एकच नाव देण्याच्या सूचना केल्यावर राजेंद्र महाजन सुचक तर किशोर गरुड अनुमोदक म्हणून त्यांनी सचिन सोमवंशी याच्या नावाची शिफारस केली एकघ नाव आल्याने तसा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला आहे. यावेळी बैठकीत जिल्हा पदाधिकारी विकास वाघ, नंदु सोनार,सचिन सोमवंशी, शहर अध्यक्ष अॅड अमजद पठाण, अनिल पाटील,युवक जिल्हा उपाध्यक्ष अॅड. अंबादास गोसावी, तालुका अल्पसंख्याक अध्यक्ष शरीफ खाटीक, ईस्माईल तांबोळी, धनंजय पाटील, जिल्हा महिला वकील अध्यक्षा अॅड. मनिषा पवार,वृषाली महाजन, गणेश पाटील, राहुल शिंदे, समाधान ढाकरे, कल्पेश येवले, मुकेश पाटील, संदीप पाटील, शिवराम पाटील, राहुल वाघ, बंटी सोनवणे आदी उपस्थित होते.