माणुसकी समुहाच्या वर्धापन दिनानिमित्त ३० डिसेंबर रोजी भव्य रक्तदान शिबीर व सेवा गौरव पुरस्कार सोहळा.
दिलीप (पाचोरा)
दिनांक~२८/१२/२०२०
औरंगाबाद जिल्हातील नावलौकिक असलेल्या माणुसकी समुह व सु-लक्ष्मी बहुद्देशिय सेवाभावी संस्था औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने चौथ्या वर्धापन दिनानिमित्त व कु.लक्ष्मी सुमित पंडित हिच्या सहाव्या वाढदिवसाच्या निमित्ताने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करन्यात आले आहे. विविध क्षेत्रात चांगले कार्य करणाऱ्या आदर्श व्यक्तींना सेवा गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. यांसाठी जिल्हाभरातील विविध क्षेत्रातील ५१ नामवंत आदर्श व्यक्ती म्हणून निवड समीती तर्फे नीवड करन्यात आली आहे. ह्या कार्यक्रमासाठी अंजली धानोरकर उपजिल्हाधिकारी,भास्कर पेरे पाटील आदर्श गाव पाटोदा,स.सो.खंडाळकर,हनुमंत भापकर साय्यक पोलीस आयुक्त औरंगाबाद,डि.एस शिनगारे पी.आय,डॉ सागर दादा गरुड, संतोष खेतमाळस, आदि मान्यवर उपस्थित राहनार आहे.या कार्यक्रमाचे विषेश आकर्षण म्हणजे खांदेशी हिले केसावर फुगे फेम अन्नाभाऊ सुरवाडे व प्रो दिनेश गुप्ता आनंश्री मुंबई, ज्युनिअर चार्ली सोमनाथ स्वभावाने यांच्या मैफिलीचा कार्यक्रम देखील आयोजीत केला आहे.हा कार्यक्रम मौलाना आझाद संशोधन केद्र टिव्ही सेंटर औरंगाबाद येथे दि ३०-१२-२०२०-रोजी सकाळी १०:३० ला रक्तदान शिबीराने सुरवात होइल.दुपारी ०२:०० वा.पुरस्कार सोहळ्याला सुरवात होनार आहे माणुसकी समुहाच्या वतीने शासकीय रुग्णालयात गोरगरिबांना अन्नदान वाटप करन्यात येनार आहे.तसेच औरंगाबाद शहरातील दानशुर रक्त दात्यानीं शासकीय रुग्णालयातील रक्तपेढि साठि जास्तीत जास्त दात्यानी रक्तदान करावे असे आव्हान समाजसेवक सुमित पंडित यांनी केले आहे
(विषेश आकर्षक भास्कर पेरे पाटील यांचे माणुसकी मा विषयावर व्याख्यान केसावर फुगे अन्ना भाऊ सुरवाडे़ यांच्या मैफिल)