ठाणे येथे बुद्धपौर्णिमा निमित्ताने महिला रिक्षा चालक व ऑर्केस्ट्रा कलाकार यांना मोफत अन्नधान्य किटचे वाटप .

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२७/०५/२०२१
ठाणे येथे बुध्दपौर्णिमेचे औचित्य साधून पोलिस गृहरक्षक संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य, समस्त महाजन भोजन रथ, जे.पी. ग्रुप ऑफ ठाणे, यांच्या संयुक्त विद्यमाने जे.पी. गुरुदेव यांच्या प्रेरणेने ठाणे महानगरपालिका उपमहापौर सौ.पल्लवी कदम, मा.श्री.बाळासाहेब पाटील. साहेब (आय.पी.एस.) पोलिस उपायुक्त वाहतूक शाखा ठाणे मुख्यालय यांच्या प्रमुख उपस्थित अत्यावश्यक सेवेतील महिला रिक्षाचालक व ऑर्केस्ट्रा कलाकार यांना मोफत अन्नधान्याचे किट व रस्त्यावरील बेघर लोकांना गोरगरिबांना, कोरोना कालखंडामध्ये दिवस-रात्र सेवा देणाऱ्या ट्रॅफिक वॉर्डन व पोलीस अधिकारी, पोलीस कर्मचारी, घर काम करणाऱ्या महिला व मजूर कामगारांना भोजन व अन्नदान करण्यात आले.
तसेच अत्यावश्यक सेवेत काम केलेल्या संस्थेतील कर्मचाऱ्यांना सुद्धा कोरोना योध्दा म्हणून सन्मानित करण्यात आले. सदर मोफत अन्नधान्य किट हे वाहतूक शाखा पोलीस उपायुक्त कार्यालय ठाणे व पायरादेवी मंदिर उपवन येथे आयोजित करण्यात आले होते.
या सर्व कार्यक्रमाचे नियोजन महाराष्ट्र अध्यक्ष मा.श्री.सिद्धार्थ डी.जाधव ,मा.श्री.धीरज पार्सेकर, निवडसमिती अध्यक्ष महाराष्ट्र राज्य ,मा.श्री.अमोल माने, मुंबई अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली मा.श्री.सतीश बनसोडे, ठाणे जिल्हाध्यक्ष, महिला अत्याचार अध्यक्षा सौ शोभना ओवाळ, महिलारिक्षा अध्यक्षा सुरज ओवाळ, हेमंत देशमुख, गुड्डू खान.सरोज पोटफोडे, यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले.