शाळेच्या संरक्षक भिंतीचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याने, माजी सरपंचांचे तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरु.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२२/०७/२०२१
हल्लीच्या कालावधीत सत्तेपुढे शहाणपण चालत नाही. असेच म्हणावे लागेल. कारण जनतेच्या भल्यासाठीचा डंका वाजवत विकासकामांसाठी विविध योजनांच्या माध्यमातून गाजावाजा करुन शासनाच्या तिजोरीतून पैसा आणायचा मग तीच विकासकामे स्वताच्या फायद्यासाठी नातेवाईकांना किंवा मर्जीतील ठेकेदारांना देऊन मलिदा खायचा हा गोरखधंदा सद्या जोरात सुरु आहे.
असाच प्रकार जळगाव जिल्ह्यासह पाचोरा तालुक्यातही मोठ्या प्रमाणात सुरु आहे. गावागावात होणारी विकासकामे करुन घेतांना वशिलेबाजी व कमिशनचा फंडा वापरुन मर्जीतील ठेकेदार किंवा नातेवाईकांना देऊन आलेली विकासकामे थातुरमातुर करुन त्यात हजारो नव्हे तर लाखो रुपये खाऊन मालामाल होण्याची साधीसुधी पध्दत असल्यामुळे या होत असलेल्या निकृष्ट कामाबद्दल कोणीही सुज्ञनागरीकांनी ओरड केल्यानंतर त्या तक्रारदालाच वेड्यात काढून प्रकरण रफादफा करण्यासाठी सगळीच भ्रष्ट यंत्रणा संघटीत असल्यामुळे तक्रारदाला उपोषण, आंदोलनाचा मार्ग स्विकारावा लागत आहे.
असाच प्रकार पाचोरा तालुक्यातील बिल्दी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेचे वाॅल कंम्पाउंडचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याने अनेक वेळा तक्रारी देऊनही प्रशासनाने दखल न घेतल्यानेमुळे अखेर उपोषणाचा मार्ग स्विकारुन चौकशीच्या मागणीसाठी माजी सरपंच एकनाथ पाटील यांनी गुरुवारपासुन तहसिल कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे.
हे वाॅल कंम्पाउंटचे बांधकाम एका महिला सदस्याच्या भावाने घेतले आहे. कामाविषयी माहिती विचारण्यासाठी एकनाथ पाटील गेले असता त्यांना मक्तेदार भागवत पाटील, कल्पना पाटील यांनी घरी घेऊन शिवीगाळ केली होती. याबाबत एकनाथ पाटील यांनी ४ मे रोजी पाचोरा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.मात्र तक्रारदारांच्या डोक्यावर राजकीय आशिर्वाद असल्यामुळे त्याचा काही उपयोग न झाल्याने माजी सरपंच एकनाथ पाटील यांनी पोलिस अधीक्षक यांचेकडे लेखी म्हणणे मांडले होते.
तरीही २२ जुनरोजी उपविभागीय अधिकारी यांचेकडुन चौकशी सुरू असतांनाच सरपंच व ग्रामसेवकाने ४ लाख रुपयांचा धनादेश काढलेला आहे. नियमानुसार ज्या कामाबद्दल तक्रार दाखल होती व चौकशी सुरु होती तरीही धनादेश देण्यात आला आहे. म्हणून या भ्रष्टाचाराचे प्रकरणात काही जबाबदार अधिकारीही सामील असू शकतात व त्यांचीही चौकशी झाली पाहिजे अशी चर्चा उपोषणस्थळी ऐकायला मिळत होती.
या निकृष्ट बांधकामाची चौकशी होऊन सबंधितावर कारवाई होत नाही तोपर्यंत माझा लढा सुरुच राहील असे माजी सरपंच एकनाथ पाटील यांनी सांगितले. तहसिल कार्यालयासमोर आमरण उपोषणला बसल्यानंतर थोड्याच वेळात गटविकास अधिकारी मा.श्री. अतुल पाटील यांनी येऊन चौकशी करुन योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर उपोषण तात्पुरते मागे घेण्यात आले आहे.
(पाचोरा तालुक्यात असाच भ्रष्टाचार वैयक्तिक घरकुल योजना, वैयक्तिक शौचालय, अश्या अनेक योजनेचा झाला असून याबाबत लवकरच भांडाफोड होण्याची शक्यता आहे.)