कु.डॉ. वैष्णवी महाजन यांनी गणित विषयात पि.एच.डी . केल्या बद्दल वृंदावन हॉस्पिटल मल्टी स्पेशालिटी सेंटर पाचोरा तर्फे गौरव.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१७/०३/२०२२
पाचोरा शहरातील रहीवाशी स्वातंत्र्य सैनीक & पाचोरा न.पा. माजी ऑक्ट्रॉय इन्स्पेक्टर स्व. दामोदर लोटन महाजन यांची नात ध्येय करिअर अँकेडमीचे संचालक संदीप दा. महाजन व पाचोरा श्री . गो. हायस्कुलच्या इंग्रजी विषयाच्या उप- शिक्षीका सौ.शितल सं. महाजन यांची मोठी कन्या कु.डॉ. वैष्णवी संदीप महाजन हिने पुणे येथील फर्ग्युसन कॉलेज मधुन गणितात (A+) पदवी तर M.Sc (A+) तसेच B.Ed (A++) यश प्राप्त करून गणित विषयात तिने J.J.T.U. येथुन Certain Investigations On Algebraic Structure Of Groups And Rings या विषायात संशोधन करून वयाच्या २६ वर्षी Ph.D. प्राप्त केली. गणित विषयात पाचोरा शहर व तालुक्यातुन प्रथम तर उत्तर महाराष्ट्रात सर्वात कमी वयात Doctorate होणारी Ph.D प्राप्त करणारी पहीली व्यक्ती ठरली आहे.
कु. प्रा.डॉ. वैष्णवी हल्ली पाचोरा येथील श्री. शेठ एम. एम. कॉलेज मध्ये सिनीअर कॉलेजला गेल्या तिन वर्षा पासुन मॅथ विभागाचे HOD म्हणुन कार्यभार सांभाळत आहे तिच्या या यशा बद्दल सौ मयुरी निळकंठ पाटील यांच्या हस्ते गौरव करण्यात आला कार्यक्रम प्रसंगी व्यासपिठावर रा स्व संघ जनकल्याण समिती जळगाव जिल्हा अध्यक्ष मनीष जी काबरा डॉ निळकंठ पाटील वृंदावन हॉस्पिटल संचालक,सौ मयुरी पाटील, प्रा डॉ वैष्णवी महाजन,संदीप महाजन सर मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन विकास लोहार सी इ ओ यांनी केले कार्यक्रमाचे आभार डॉ निळकंठ पाटील यांनी मानले.