वाकी मुक्कामी येणार्या बस सूरू करण्याची मागणी.
कदीर पटेल.(सिल्लोड तालुका प्रतिनिधी)
दिनांक~२७/१२/२०२०
सिल्लोड आगाराची घाटनांद्रा मार्गे धावणारी वाकी, चिंचोली लिंबाजीमार्गे येणारी सिल्लोड- वाकी-चाळीसगाव. व औरंगाबाद आगाराची औरंगाबाद- वाकी या वाकी येथे मुक्कामी येणार्या बसेस सूरू कराव्यात अशी मागणी प्रवाशांनी केली आहे. लाॅकडाऊन झाल्यापासून. घाटनांद्रामार्गे वाकी मुक्कामी येणार्या बसेस बंद आहेत, वाकी येथे शिवेश्रवाराचे प्रसिद्ध देवस्थान असल्याने येथे भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी येतात यामूळेच गेल्या अनेक वर्षापासून औरंगाबाद आगाराची औरंगाबाद- वाकी, सिल्लोड आगाराच्या औरंगाबाद- वाकी, सिल्लोड- वाकी चिंचोली लिंबाजीमार्गे व सिल्लोड- वाकी घाटनांद्रामार्गे, टाकळी अंतूर घाटशेंन्दा मार्गे या बसेसच्या फेर्रा वाकी मुक्कामी सूरू होत्या. मात्र कोरोनामूळे त्या बंद करण्यात आल्या होत्या. गेल्या काही महिन्यांपासून हळूहळू सर्व नियम शिथिल करण्यात आल्याने लालपरी रस्त्यावर धावू लागली असली तरी येथील बस सूरू केल्या नाहींत. यामुळे परिसरातील नागरीकांची व विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत आहे. पर्यायी व्यवस्था नसल्याने रात्रीच्या वेळी नाईलाजाने प्रवाशांवर पायपीट करीत घर गाठण्याची वेळ आली आहे. त्यामुळे या परिसरातले नागरीका व प्रवाशांनी या बसेस सूरू करण्याची मागणी केली आहे.