एकदिवस शेतकर्यांना न्याय मिळउन देण्यासाठी कडकडित बंद पाळावा. महाविकास आघाडीतर्फे आमदार किशोर पाटिल यांचे अवाहन.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०७/१२/२०२०
भारत बंदला प्रतिसाद देण्यासाठी पाचोर्यात आमदार किशोर पाटील यांच्या उपस्थितीत महाआघाडीची बैठक संपन्न होउन भाजपा सरकारने तयार केलेल्या कृषी कायद्या विरूध्द दिल्लीत बंद पुकारलेल्या शेतकर्यांना पाठीशी उभे राहण्यासाठी आज बंदला साथ देण्यासाठी अवाहन करण्यात आले.
पाचोरा महाआघाडीच्या वतीने पाचोरा- भडगाव तालुक्यातील सर्व व्यापारी बांधवांनी बंद पाळण्यासाठी शिवसेनेचे आमदार किशोर पाटील यांच्या उपस्थीतीत शिवसेना कार्यालयात पञकार परिषद घेण्यात आली यावेळी, नगराध्यक्ष संजय गोहिल, उपनगराध्यक्ष शरद पाटिल, मुकुंद बिल्दीकर गणेश पाटील,बापु हटकर, पप्पु राजपूत, हरी पाटील, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस चे तालुकाध्यक्ष साहेबराव पाटील, प्रताप पाटील, नंदू सोनार , विकास वाघ, राष्ट्रवादी काँग्रेस चे नगरसेवक विकास पाटील, अझहर खान , सुनील शिंदे ईरफान मणियार , सतिष चौधरी, रणजित पाटील, किशोर बारावकर , सुनिल शिंदे आदी उपस्थित होते.यावेळी बोलतांना आमदार किशोर पाटिल म्हणाले की,केंद्र सरकारच्या विरोधात राज्यातिल महाविकास आघाडी ही शेतकर्यांच्या पाठीशी उभी आहे.देशातिल ११ पक्षांनी या भारत बंदला पाठिंबा दिला आहे. पाचोरा भडगाव शहर व तालुक्यातिल महाआघाडिच्या सर्वच नेत्यांनी एकत्रीत येवून जाहीर पाठिंबा दिला आहे. महाविकास आघाडीचा माध्यमातुन राज्यभर आंदोलन पुकारण्यात आले आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी, व्यापार्यांना न्याय मिळवून देण्यासाठी व्यापारी बांधवांनी कडकडीत बंद ठेवू राज्यातील शेतकऱ्यांसाठी सर्वांनी बंदत सहभागी व्हावे एक दिवस अन्नदात्यासाठी द्यावा असे अवाहन केले.गेल्या ९ महिन्यापासुन करोनामुळे सर्वसामान्यासह व्यापारी वर्ग होरपळुन निघाला आहे.यात शेतकर्यांसाठी एक दिवस या भारत बंदच्या हाकेला प्रतिसाद द्यावा. अत्यावशक सेवा वगळता सर्वच क्षेञातिल व्यापार्यांनी बंद ठेवण्याचे अवाहनही त्यांनी यावेळी केले.याप्रसंगी राष्टवादीचे विकास पाटिल,काॅग्रेसचे नंदु सोनार यांनीही आपली मते मांडली.या बैठकीचे सुञसंचलन व आभार अझर खान यांनी केले.
सकाळी सर्व बंदचे आवाहन करण्यात आले आहे.