अंधारी परिसरात अद्रकचे दर घसरल्याने शेतकरी हवालदिल, झालेला खर्चही निघत नसल्याने शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ.

कदीर पटेल (सिल्लोड तालुका प्रतीनिधी)
शेतकरी हा निसर्गावर अवलंबून शेती करत असतो त्यातल्यात्यात निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. त्यातल्यात्यात निसर्गाशी सामना करत जिवापाड मेहनत करून शेतकऱ्यांनी आद्रक लाऊन चांगले उत्पन्न काढण्यासाठी प्रयत्न केला मात्र त्याला आता नको त्या प्रसंगाला सामोरे जावे लागत आहे.
अद्रकला सध्या बाजारात योग्य दर मिळत नसल्याने सिल्लोड तालुक्यातील अंधारी परिसरातील शेतकरी अडचणी सापडले आहेत सध्या अद्रकला प्रतिक्विंटल हजार ते बार शे रूपये दर मिळत असून पण खर्चाच्या तूलनेत तो परवडत नाही. असे शेतकर्याचे म्हणने आहेत तसेच अंधारी, लोणवाडी माडगाव, दीडगाव, उपळी, म्हसला टाकळी, मोहरा बोरगांव सारवाणी, बोरगांव बाजार, परिसरात शेतकरी कपाशी या पिकाबरोबरच अद्रकीचे उत्पादन घेतात यंदा जुन जूलै महिन्यात दमदार पडलेल्या पावसावर अद्रकाची मोठ्या प्रमाणावर लागवड करण्यात आली त्यावर पाऊही बर्यापैकी पाऊस झाल्याने विहिरी तलाव तूडूंब भरलेली आहेत तसेच आता विहिरीने तळ गाठला सूरूवात केल्याने शेतकर्याना नाईलाजाने अद्रकची काढणी करावी लागत आहे यंदा सततच्या झालेल्या अवकाळी पावसामुळे अद्रक चांगलेच बहरलेली आहे. पण अद्रकला सध्या बाजारात योग्य दर मिळत नसल्याने कवडीमोल भावाने विक्री करावी लागत आहे सध्या अंधारी परिसरात खाजगी व्यापार्याकडून अद्रकला प्रतिक्विंटल हजार ते बार शे रूपये दर मिळत असून पण खर्चाच्या तूलनेत तो परवडत नाही त्याचे कारण म्हणजे महागडी औषधी फवारणी करूनही काही महागडी खते कीटक नाशक औषधी व मजूरी हा सर्व खर्च लक्षात घेता हादर अद्रकाला परवडत नाही. एक एकर अद्रक लागवडीसाठी कोबडी खत एक टॅक्टर पंधरा हजार रुपये शेणखत वीस हजार रूपये रासायनिक खते पंधरा हजार रुपये शिवाय लागवड ते काढणीपर्यतचा खर्च पंचवीस हजार अद्रक बेणे पंचवीस असा एकून एकरी एक लाख बारा हजार रुपये खर्चा येत असल्याने शिवाजी तायडे अंधारीचे शेतकरी यांनी सांगितले आहे.