सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • बोगस शिक्षक भरती प्रकरणी धापेवाडा येथील भाजपच्या माजी तालुका अध्यक्षाला अटक.

  • गुटखा प्रकरणी आरोपीच्या दोन दिवसांच्या पोलीस कोठडीत, पाचोरा पोलीसांच्या हाती मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता.

  • पोलीस कारवाई होताच दोघे गुटखा किंगचा झाला समेट , एकाने पोलीस स्टेशनला जाऊन वाहनचालकाची घेतली भेट.

  • पोलीसांनी गुटखा पकडला मात्र गुटखा किंगवर ठोस कारवाई कधी ?

  • जळगावच्या महिलेकडून अंबे वडगाव येथील प्लॉट धारकांची फसवणूक, पोलीस स्टेशनला तक्रार दाखल.

महाराष्ट्र
Home›महाराष्ट्र›शिवसेनेचे ‘ताला ठोको’आंदोलन आमदार पाटलांसह इतरांना अटक व सुटका.

शिवसेनेचे ‘ताला ठोको’आंदोलन आमदार पाटलांसह इतरांना अटक व सुटका.

By Satyajeet News
June 7, 2021
143
0
Share:
Post Views: 68
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०७/०६/२०२१

पाचोरा नंदू शेलकर वीज वितरण कंपनीच्या मनमानी कारभाराच्या निषेध करण्यासाठी आज तालुक्यात आमदार किशोरआप्पा पाटील यांच्या नेतृत्वाखाली महावितरणच्या कार्यालयांना ‘ताला ठोको’ आंदोलन करण्यात आले. तर, पोलिसांनी आमदारांसह समर्थकांना ताब्यात घेऊन नंतर त्यांना सोडून दिले.

याबाबत वृत्त असे की, आमदार किशोर पाटील यांनी आधीच महावितरणच्या विरोधात आंदोलनाचा इशारा दिला होता. विज वितरण कंपनीचे अधिकारी व कर्मचारी शेतकऱ्यांच्या कृषी पंपाना विज मीटर बसविलेले नसतांना अव्वाच्या सव्वा विज बिल वसुली करत आहेत. विज वितरण कंपनीने मागील बिलांच्या २५ टक्के वसुली करण्यासाठी सन – २०२२ ची मुदत दिलेली असतांना अधिकाऱ्यांच्या आदेशावरून कर्मचारी शकतो तकऱ्यांनकडून बळजबरीने विज बिल वसुली करत आहेत. एका रोहित्र वरील काही शेतकऱ्यांनी पैसे भरलेले असतांना कंपनीचे कर्मचारी त्या रोहित्रावरील संपुर्ण सगळ्या शेतकऱ्यांचे सरसकट विज कनेक्शन बंद करत आहेत. रोहित्र जळाले किंवा त्यात बिघाड झाल्यानंतर केवळ ८ तासात बसविण्याचे परिपत्रक असतांना अधिकारी व कर्मचारी त्या पोटी मोठी वसुली करुन एक ते दिड महिन्यात नविन रोहित्र बसविणे अथवा नादुरुस्त रोहित्र दुरुस्त करतात असा आरोप आज आमदारांनी आंदोलनाप्रसंगी केला.

आ. पाटील पुढे म्हणाले की, पाचोरा मतदार संघातील केवळ १० ते १५ टक्के शेतकऱ्यांच्या विहीरींना पाणी असल्याने ते शेतकरी मे महिन्यात कापसाची लागवड करतात. मात्र विज वितरण कंपनीच्या आळमुठेपणामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. यामुळे आमदार किशोर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पाचोरा व भडगाव तालुक्यातील २५ कार्यालयात एकाच वेळी सकाळी ११ वाजता कुलुप ठोकण्यात आले.

कार्यालयांना टाळे लावल्यानंतर आमदार किशोर पाटील यांचेसह २५ ते ३० कार्यकर्त्यांना अटक करुन पोलिस व्हॅनमध्ये नेण्यात आले. ६८ कलमानुसार गुन्हे दाखल करुन ६९ कलमानुसार सोडण्यात आले. टाळे ठोको आंदोलना प्रसंगी ५ पोलीस अधिकाऱ्यांसह पाचोरा, पहुर, जामनेर येथील १०० पोलिस कर्मचारी आणि होमगार्ड बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले होते.

आमदार किशोर पाटील यांनी १ जुन रोजी पत्रकार परिषदेचे आयोजन करुन शेतकऱ्यांचे विज वितरण कंपनी करत असलेला छळ न थांबविल्यास ५ जुन नंतर पाचोरा मतदार संघातील सर्व विज वितरण कंपनीच्या कार्यालयास टाळे ठोकण्याचा इशारा दिला होता. मात्र ६ जुनला रविवार ची सुट्टी असल्याने अखेर सोमवारी आमदार किशोर पाटील यांनी स्वतः उपस्थित राहुन पाचोरा येथील गिरड रोड वरील कार्यकारी अभियंता श्याम दासकर यांच्या कार्यालयाला कुलुप ठोकले. याच वेळी पाचोरा शहरातील भाग – १ चे उप कार्यकारी अभियंता आसित राठोड, भाग – २ रविंद्र शिरसाठ, भडगाव येथील अजय धामोरे, नगरदेवळा येथील पुरुषोत्तम बोरनारे यांचे सह दोन्ही तालुक्यातील ५ मुख्य कार्यालय व १९ उप केंद्रास सकाळी ११ वाजता कुलुप लावण्यात आले.

पाचोरा शहरातील गिरड रोड वरील मुख्य कार्यकारी अभियंता कार्यालयात आमदार किशोर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली टाळे ठोको आंदोलना वेळी नगराध्यक्ष संजय गोहील, शहर अध्यक्ष किशोर बारावकर, बाजार समितीचे प्रशासक चंद्रकांत धनवडे, नगरसेवक राम केसवानी, शितल सोमवंशी, दत्ता जडे, बापु हटकर, आनंद पगारे, गणेश पाटील, प्रविण ब्राम्हणे, सुनिल महाजन, जितेंद्र पेंढारकर, सुमित सावंत, गजु पाटील सह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
पाचोरा येथे राज्यातील पहिलेच टाळे ठोको आंदोलन यशस्वी झाल्यानंतर याचे पडसाद राज्यभर उमटणार असल्याचे भाकीत वर्तविले जात आहे.

मुख्य कार्यकारी अभियंता श्याम दासकर यांच्या कार्यालयास कुलुप ठोकण्याच्या १५ मिनिटे अगोदर मुख्य कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांना बाहेर काढुन कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी त्यांचे कुलुप लावुन घेतले होते. त्यानंतर आमदार किशोर पाटील यांनी ११ वाजता कुलुप लावले. यावेळी पोलिस निरीक्षक किसनराव नजन पाटील, सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश चौबे, विकास पाटील, जळगांव येथील एस. आय. डी. च्या सहाय्यक पोलिस निरीक्षक शुभांगी पाटील, विजय जाधव, नितीन सुर्यवंशी, यशवंत घोडसे, राहुल बेहरे, राहुल सोनवणे, अजय मालचे, किरण पाटील सह होमगार्ड बंदोबस्तासाठी उपस्थित होते.

(स्व.बाळासाहेब ठाकरेंच्या शिकवणीची आठवण)

टाळे ठोको आंदोलनानंतर आमदार किशोर पाटील यांनी सांगितले की, मी जरी सत्ताधारी पक्षाचा आमदार असलो तरी प्रथम शेतकऱ्यांचा प्रतिनिधी आहे. बाळासाहेबांनी दिलेल्या सत्तेतील जिल्हा परिषद सदस्य असो किंवा आमदार असो ते जर लोकांची कामे करत नसतील तर त्यांच्या घरावर मोर्चे आणा. अशी शिकवण स्व. बाबासाहेब ठाकरे यांनी आम्हास दिलेली असल्याने शेतकऱ्यांवर अन्याय होत असेल तर ते मी कदापि सहन करणार नाही. या टाळे ठोको आंदोलनानंतर ही विज वितरण कंपनीच्या अधिकारी व कर्मच्यारांमध्ये सुधारणा न झाल्यास यापुढे कोणत्याही प्रकारची पुर्व सुचना न देता कंपनीच्या अधिकाऱ्यांना कार्यालयात जावुन ठोकल्या शिवाय राहणार नाही. व त्या बाबत होणाऱ्या परिणामाची तमा ही बाळगणार नसल्याचा इशारा आमदारांनी दिला.

याप्रसंगी आमदार पाटील यांनी विरोधकांवरही टीका केली. ते म्हणाले की, पाचोरा मतदार संघातील शेतकरी बांधवांवर विज वितरण कंपनीचे अधिकारी व कर्मचारी दिवसा ढवळ्या अन्याय करुन त्यांना छळत आहेत. वास्तविक पाहता हे आंदोलन करण्याचे काम विरोधी पक्षाचे होते. मात्र पाचोर मतदार संघात विरोधक जागृत नसल्यामुळे मी सत्तेत असुनही मला हे काम करावे लागत असल्याचे आमदार किशोर पाटील यांनी सांगितले.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Previous Article

Next Article

वरखेडी येथे हयात मेडिकलचा शुभारंभ..

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • महाराष्ट्र

    ओबीसी आरक्षण वाचविण्या संदर्भात समता परिषदेसह विविध ओबीसी संघटनांचे पारोळा तहसीलदार यांना निवेदन.

    November 26, 2020
    By Satyajeet News
  • महाराष्ट्र

    शिर्डी येथील पत्रकारांवर दाखल झालेल्या खोट्या गुन्ह्या बाबत, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे पाचोरा येथे निषेध निवेदन

    February 2, 2021
    By Satyajeet News
  • महाराष्ट्र

    २६ मार्चपर्यंत करा तातडीची कामे, येत्या १० दिवसात फक्त दोन दिवस उघडतील बँका.

    March 21, 2021
    By Satyajeet News
  • मनोरंजनमहाराष्ट्रराजकीयशासकीय योजनासंपादकीयसांस्कृतिक

    लडाख गटाचा निवडणुकीवरील बहिष्कार मागे – अमित शाह यांच्या आश्वासनानंतर निर्णय

    September 28, 2020
    By Satyajeet News
  • महाराष्ट्र

    उठ मराठ्या जागा हो, अन्याया विरोधात तू धागा हो, मराठा बांधवांनो मोठ्या संख्येने आझाद मैदानावर या.

    July 13, 2023
    By Satyajeet News
  • महाराष्ट्र

    २९ ऑगस्ट गुरुवार रोजी पाचोरा येथे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे खान्देश विभागीय अधिवेशन.

    August 27, 2024
    By Satyajeet News

You may interested

  • Uncategorized

    लम्पी स्कीन आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वरखेडी येथील गुरांचा बाजार बंद.

  • आपलं जळगाव

    निधन वार्ता. जितेंद्र राठोड.

  • आपलं जळगाव

    आमदार किशोर आप्पा पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

दिनदर्शिका

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज