अंबे वडगाव येथे अंतर्गत रस्त्यांचा लोकार्पण सोहळा संपन्न.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०१/१२/२०२०
पाचोरा तालुक्यातील अंबे वडगाव येथे ग्रामपंचायत मार्फत २५/१५ योजनेअंतर्गत गावात सिमेंट कॉंक्रीटचा रस्ता व फ्लेवर बॉक्स बसवून अंतर्गत रस्त्यांचे काम पूर्ण केले होते.
या रस्त्यांचा लोकार्पण दिनांक २९ नोव्हेंबर रविवारी मा.आमदार श्री. किशोरआप्पा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत व त्यांच्याच हस्ते रस्ता पूजन व श्रीफळ वाढवून करण्यात आले. या प्रसंगी शिवसेनेचे मा.श्री. अरुण पाटील यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. या प्रसंगी माजी जिल्हापरिषद सदस्य दिपकसिंग राजपूत, गणेश पाटील, राजुदादा पाटील, हे प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित होते.
या प्रसंगी विनायक शळके, मंगेश गायकवाड, उपसरपंच सौ. हमीदाबाई तडवी, सौ.सरलाबाई निकम, मच्छिंद्र थोरात, अमरसिंग पवार, प्रदिप सानप, ग्रामसेवक नारायन सोनवणे, बालू चंद्रे, सजय देवरे, शशिकांत वाघ, मंगेश खैरनार, भोलाभाऊ शळके आण्णा चव्हाण, कैलास निकम, नाना शिंदे, राजेंद्र भुसारे, गजानन चंद्रे व असंख्य ग्रामस्थ हजार होते.