दिपकभाऊ राजपूत यांच्याकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पंचेचाळीस हजार रुपयांची मदत.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१७/०९/२०२१
मागील पंधरवड्यात पाचोरा व जामनेर तालुक्यात अतिवृष्टी व चक्रीवादळाने शेतकऱ्यांच्या शेतीमाल,पशुधन व घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.सततच्या निसर्गाच्या लहरीपणामुळे वैतागलेला शेतकरी व त्यातच अतिवृष्टी व चक्रीवादळाचा फटका हतबल झालेल्या शेतकऱ्यांना आपणाकडून काहीतरी मदत व्हावी म्हणून लोहारा,कुऱ्हाड गटाचे माजी जिल्हापरिषद सदस्य मा.श्री. दिपकभाऊ राजपूत यांनी जामनेर तालुक्यातील ओझर येथील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भेटून फुल नव्हे तर फुलाची पाकळी म्हणून ४५०००/०० हजार रुपये मदत दिली.
यात ओझर येथील शेतकरी रमेश माळी यांना १००००/०० रुपये, मुखत्यारसिंग पाटील यांना १००००/००रुपये सुभाष कोकाटे यांना१००००/००, चक्रीवादळामुळे पत्रे उडून प्रकाश तेली यांचे बैल जबर जखमी झाले होते म्हणून बैलाच्या उपचारासाठी ५०००/०० रुपये तसेच तोंडापूर येथील मुशिर शेख हे पुराच्या पाण्यात वाहून जात मयत झाले होते म्हणून त्यांच्या कुटुंबियांना १००००/०० हजार रुपये रोख रक्कम देऊन आर्थिक मदत केली.
या वेळी सांडू मामा गुरव, जिल्हा उपसंघटक,अँड.प्रकाश पाटील, माजी शिवसेना तालुकाप्रमुख अतुल सोनवणे, शहर प्रमुख विलास पाटील,शेंदुर्णी शहर प्रमुख उस्मान शेख, शहर संघटक, पवन माळी माजी शहर प्रमुख दिपक माळी उपशहर प्रमुख कैलास माळी, सुरेश चव्हाण, कृष्णा गुरव व सर्व शिवसैनिक हजर होते.