पाचोरा तालुक्यातील कळमसरा शिवारात बिबट्याचा थरार, एक गाय फस्त.

Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
दिलीप जैन (पाचोरा)
दिनांक~११/०२/२०२१
पाचोरा तालुक्यातील कळमसरा येथील राजु रामदास मोरे यांच्या कुऱ्हाड ते कळमसरा रस्त्यावर असलेल्या शेतातील खळ्यात गाय बांधलेली होती. दि.११/०२/२०२१ रोजी रात्री १.३० ते २ वाजेच्या सुमारास बिबट्या ने हल्ला करून राजु मोरे यांच्या मालकीची अंदाजे विसहजार रुपये किंमतीची गाय ठार मारली सुदैवाने बाजूला बांधलेल्या बैलजोडीस बिबट्याने इजा केली नाही.
कळमसरा गावाजवळील शेतशिवार हे कळमसरा, म्हसास राखीव जंगलाच्या जवळच असल्याने मागील काही दिवसापासून या गावपरीसरात बिबट्याचा वावर वाढला असून बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांना बिबट्याचे दर्शन झाल्याचे या परिसरातील शेतकरी सांगतात.
घटनास्थळी पशुवैद्यकीय अधिकारी व वनविभागाचे कर्मचाऱ्यांनी भेट देऊन परिस्थिती जाणून घेत शेतकऱ्यांना योग्य सुचना दिल्या असून प्रत्येकाने खबरदारी घ्यावी असे सुचवले आहे.
Download WordPress Themes Nulled and plugins.