पाचोरा शहरात बंद घर फोडुन ऐवज लांबवला , गुन्हा दाखल.
दिलीप जैन. (पाचोरा)
दिनांक~०६/१२/२०२०
पाचोरा शहरातील बळीराम नगरातील बंद घर अज्ञात चोरट्यांनी फोडून घरातील सोन्याचे दागीने आणि रोकड असा एकुण ६८ हजार ५०० रूपये किंमतीचा मुद्देमाल लंपास केल्याचे शनिवार दि. ५ डिसेंबर रोजी रात्रीच्या सुमारास उघडकीला आला आहे. याप्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
नरेंद्र भास्कर गायकवाड (वय-३४) रा. बळीराम नगर हे खासगी नोकरीला आहे. कामाच्या निमित्ताने ४ डिसेंबर रोजी दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास घराला कुलूप लावून ते बाहेरगावी गेले होते. शनिवार दि. ५ डिसेंबर रोजी रात्री ८ वाजता घरी आल्यावर त्यांनी घराच्या मुख्य दरवाजाचा कडी कोयंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी चोरी केल्याचे लक्षात आले. घरात जावून पाहणी केली असता लोखंडी कपाटाचे लॉकर तोडून कपाटातील ३० हजार रूपये किंमतीचे सोन्याचे चैन, १५ हजार रूपये किंमतीचे ५ ग्रॅम सोन्याची अंगठी, १३ हजार ५०० रूपये किंमतीचे साडेचार ग्रॅम वजनाचे सोन्याचे कानातले टोंगल आणि १० हजार रूपये रोख असा एकुण ६८ हजार ५०० रूपये किंमतीचा मुद्देमाला चोरून नेला होता. तसेच घरातील सर्व सामान अस्तव्यत करून ठेवला होता. याप्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात धाव घेवून घटनेची माहिती दिली. याप्रकरणी नरेंद्र गायकवाड यांच्या फिर्यादीवरून पाचोरा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो.हे.कॉ. अजय मालचे करीत आहे.