उपजिल्हाधिकारी निलम बाफणा व गणेशजी पारिख यांची कोल्हे येथील स्व. आर. एस. बाफणा गोशाळेला सदिच्छा भेट.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२९/१०/२०२२

कोल्हे येथील रहिवासी मा. श्री. भरतकुमार बाफणा व सौ. पुष्पलता बाफणा यांची सुपुत्री, मा. श्री. रमेशचंद्रजी बाफणा यांची पुतणी व सद्यस्थितीत माजलगाव, वडवणी येथील उपजिलाधिकारी निलम भरतकुमार बाफना व श्री. गणेशजी पारिख यांनी कोल्हे येथील स्व. आर. एस. बाफणा गोशाळा व स्व. आर. एस. बाफणा कृषी तंत्र विद्यालयाला नुकतीच भेट दिली.


(सबस्क्राईब करा, लाईक करा.)

याप्रसंगी उपजिल्हाधिकारी मा. निलम बाफणा व गणेशजी पारिख यांचा मा. श्री. रमेशचंद्रजी बाफणा, किशोर शेट बाफणा, कोल्हे गावचे सरपंच अशोक सुरडकर, उपसरपंच एकनाथ पाटील, ग्रामपंचायत सदस्य सतीश गोपाळ, शकुर तडवी यांनी शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केले.

या भेटी प्रसंगी स्व. आर. एस. बाफणा गोशाळेत ७५ गायींची चारा, पाण्याची चांगली व्यवस्था, सतत गायत्री मंत्राचा उच्चार करणारे यंत्र, गायी पासून मिळणाऱ्या शेणापासून गोवऱ्या बनवणे व पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये म्हणून अग्नी संस्कारासाठी पंचक्रोशीतील गावागावत गोवऱ्या पुरवणे, गोमुत्राचे संकलन करुन ते शेतीसाठी वापर करणे, त्याचप्रमाणे टाकीव चाऱ्या पासुन गांडूळ खत निर्मिती करणे व यापासून मिळणाऱ्या पैशातून गोशाळेला स्वयंपूर्ण करण्यासाठीचा प्रयत्न व सगळ्या सुविधा व सोयी पाहून शेततळ्याला भेट दिली.

तसेच स्व. आर. एस. बाफणा कृषी तंत्र विद्यालयात शेतकी डिप्लोमासाठी १२० मुले व मुली शिक्षण घेत असून या विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण घेता यावे म्हणून सुसज्ज अशा शाळा खोल्या, सुसज्ज अशी प्रयोग शाळा, विद्यार्थ्यांना वाचनासाठी पुस्तके उपलब्ध व्हावीत म्हणून वाचनालय, स्वच्छतागृह ह्या सगळ्या सुविधा पाहून एका कोल्हे सारख्या छोट्याशा गावात गोरगरिबांच्या, शेतकरी कुटुंबातील मुलांना शिक्षणासाठी व्यवस्था करुन दिल्याबद्दल तसेच चांगल्याप्रकारे गोशाळेची व्यवस्था पाहून उपजिल्हाधिकारी निलम बाफणा व गणेशजी पारिख यांनी मा. श्री. रमेशचंदरजी बाफणा यांच्या कार्याबद्दल कौतुक केले व बाफणाजी व ग्रामस्थांचे आभार मानले.


(सबस्क्राईब करा व लाईक करा.)

तसेच गोशाळेत रात्रंदिवस मेहनत घेऊन गोशाळेतील गायींना वेळेवर चारापाणी करुन साफसफाई ठेवणारे बबनराव पवार, शंकर पवार, सौ. सगुणा पवार, सौ. शारादा पवार, बबनराव तडवी व सचिन मुळे यांच्या कामाचे कौतुक केले.

ब्रेकिंग बातम्या