सौ. वैशालीताई सुर्यवंशी पाचोरेकरांसाठी ठरल्या भगीरथ, टॅंकर पूजन करुन केला मोफत जलसेवेचा शुभारंभ.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१०/०२/२०२४
सद्यस्थितीत उन्हाळ्याची चाहूल लागताच मागील काही दिवसांपासून पाचोरा शहरवासीयांना भिषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. हि बाब लक्षात घेऊन पाचोरा वासियांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागु नये म्हणून व आपणही या समाजाचे काही देणे लागतो ही भावना मनात बाळगून उध्दव बाळासाहेब ठाकरे सेनेच्या जेष्ठ नेत्या सौ. वैशालीताई सुर्यवंशी यांनी स्वखर्चाने टॅंकरच्या माध्यमातून मोफत पाणीपुरवठा योजना होती घेतली असून आज नुकतेच उध्दव बाळासाहेब ठाकरे सेनेचे शहरप्रमुख भरत खंडेलवाल, अनिल सावंत, राजुभाऊ काळे, दादाभाऊ चौधरी, संदिप जैन, नामदेव चौधरी, खंडू चौधरी, मनोज चौधरी, अशोक पाटील, अभिषेक खंडेलवाल, पप्पू जाधव यांच्या उपस्थितीत टॅंकरची पुजा करुन पाचोरा शहरात मोफत पाणी पुरवठा करण्याचा शुभारंभ केला आहे.
ऐनवेळी उन्हाळ्याच्या झळा बसत असतांनाच पाचोरा वासियांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत होते ही बाब लक्षात घेऊन पाचोरा वासियांना मोफत पाणीपुरवठा करण्यासाठीची मोहीम हाती घेतल्यामुळे आज अशा बिकट परिस्थितीत सौ. वैशालीताई सुर्यवंशी यांनी एकप्रकारे भगीरथाची भुमिका पार पाडत आहेत असे मत सुज्ञ नागरिकांनी व्यक्त केले आहे. तसेच पाचोरा शहरात मोफत पाणी पुरवठा केला जात असून भविष्यात खेड्यापाड्यातील वाडावस्तींवर जरी पाणीटंचाई निर्माण झाली तरी तेथेही टॅंकरव्दारे पाणीपुरवठा करुन समस्येचे निराकरण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचे सौ. वैशालीताई सुर्यवंशी यांनी सांगितले.