वाकोदचा पाणी प्रश्न लवकरात लवकर सोडवा अन्यथा जिल्हापरिषद व जिल्हाधिकारी कार्यालयावर वाकोद ग्रामस्थांचा हंडा मोर्चा, सौ.वंदनाताई चौधरी यांचा इशारा.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१३/०३/२०२२
वाकोद हे गाव जामनेर तालुक्यातील अत्यंत महत्त्वाचे गाव आहे. या गावाला गेल्या अनेक वर्षापासून पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. गावातील नागरिकांनी या भीषण पाणीटंचाई विरोधात वेळोवेळी आवाज उठवला व या सततच्या मागणीचे फलित म्हणून राष्ट्रीय पेयजल योजनेतून पाणीपुरवठा करण्यासाठी १,८६,९५,३९४/०० रुपये मंजूर होऊन ई टेंडर प्रक्रियेतून उमेश एंटरप्राइजेस, भुसावळ यांना कामाचे कंत्राट मिळाले आहे.
कंत्राट मिळाल्यानंतर या ठेकेदाराने २९-एप्रिल २०२० रोजी कामालि सुरवातही केली मात्र आता २०२२ वर्ष उजाडले आहे. तरीही गेल्या अनेक महिन्यांपासून काम बंद आहे. त्यामुळे वाकोद गावचे ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. कारण येणाऱ्या मार्च महिन्यात वाकोदकरांना भिषण पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. या पाणीटंचाईच्या झळा ग्रामस्थांना बसू नयेत म्हणून हे काम थांबवण्यासाठी जबाबदार असलेले पदाधिकारी व अधिकारी यांच्यावर कारवाई करून कामाला त्वरित सुरुवात व्हावी याकरिता वाकोदकरांनी ठेकेदाराविरोधात एकदिवसीय उपोषण व धरणे आंदोलन केले.
ही बाब जळगाव राष्ट्रवादी काँग्रेस महिला जिल्हाध्यक्ष तथा प्रदेश सचिव राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या सौ. वंदनाताई चौधरी यांनी उपोषण व धरणे आंदोलनाचे ठिकाणी जाऊन या आंदोलनात सहभागी होऊन जिल्हा स्तर, मंत्रालय स्तरावर बोलून त्यांचे काम लवकरात लवकर मार्गी लावण्याची मागणी केली. एखादे गाव आपल्या विरोधात मतदान करते, म्हणून त्या गावांच्या कामात खोडा घालायचा असे कपटी राजकारण काही लोक वाकोद गावाबद्दल करत आहेत.
त्यांच्या कपटी राजकारणाला व दबावाला बळी न पडता ग्रामस्थ मोठ्या ताकतिने उभे राहिलेत आहेत ही चांगली बाब आहे. तसेच मी ग्रामस्थांसोबत आहे. जर त्यांचे काम लवकरात लवकर मार्गी लागले नाही तर थेट हंडा मोर्चा घेऊन जिल्हापरिषद व जिल्हाधिकारी कार्यलयावर हंडा मोर्चा काढण्यात येईल व होणाऱ्या परिणामांना शासन, प्रशासन जबाबदार राहील असा इशारा दिला आहे.