पाचोरा तालुक्यातील मराठा समाजबांधवांनी शांततेच्या मार्गाने आंदोलन करावे, सचिन सोमवंशी.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~३०/१०/२०२३

महाराष्ट्रात मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे म्हणून समाज बांधव रस्त्यावर उतरले असुन शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्याचे आवाहन मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक सचिन सोमवंशी यांनी केले आहे.

मराठा आरक्षण १६ टक्के दिल्यावर टिकु शकले नाही तेच आरक्षण तात्काळ केंद्र सरकार दिले पाहिजे यासाठी मराठा क्रांती मोर्चाचे लाखो मोर्चे महाराष्ट्रात शिस्तबद्ध पद्धतीने केले जात आहेत. परंतु सत्ताधारी शासनाला याची कदर नाही. मराठा समाजाला आरक्षण दिले पाहिजे ही जर मानसिकता भाजपा, शिंदे सेना व राष्ट्रवादी कांग्रेस (अजित पवार गट), सत्ताधारी पक्षांसह विरोधातील पक्षांची असेल तर मग कुणाचाही विरोध नसतांनाही हा प्रश्न ताटकळत न ठेवता हा प्रश्न तात्काळ सुटायला पाहिजे.

पण तशी मानसिकता सत्तेतील मुजोरांची दिसत नाही. एकीकडे मराठ्यांना कामाला लावायचे आणि दुसरीकडे ओ. बी. सींची जागर यात्रा काढायची हे सामान्य जनतेला कळणार नाही असे होईल का ? मात्र जनता बघत आहे हिशोब बाकी आहे. मराठा विरोधात ओ. बी. सी. असा वाद निर्माण करुन नेमका कुणाला राजकीय फायदा होईल हे जनतेला माहिती आहे असे श्री. सोमवंशी यांनी म्हटले आहे.

आपल्या मागणीसाठी आंदोलन करतांना कोणत्याही सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होणार नाही याची काळजी आंदोलकांनी घ्यावी कारण ही सार्वजनिक मालमत्ता आपलीच आहे म्हणून कुठेही सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान न करता पाचोरा तालुक्यातील गावागावात राजकीय फलकांसह प्रवेश बंदी करुन शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्याचे आवाहन मराठा क्रांती मोर्चा करत असुन पंतप्रधान मोदी यांची भेट घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा प्रश्न सोडवा अन्यथा होणाऱ्या परीणामास हेच जबाबदार राहतील अशी विनंती वजा सुचनाही सचिन सोमवंशी यांनी दिली आहे.

ब्रेकिंग बातम्या