आर्वे गावाजवळील मोठ्या पाझर तलावातून होत असलेली पाणीचोरी थांबवा, आर्वे ग्रामस्थांची मागणी.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~३०/१०/२०२३

पाचोरा तालुक्यातील आर्वे गावाजवळील मोठ्या पाझर तलावातून काही
शेतकरी अनधिकृतपणे विद्युत मोटारी व मशीनच्या साह्याने बेसुमार अवैध पाण्याचा उपसा करत असल्याने भविष्यात भिषण पाणीटंचाईची समस्या निर्माण होऊन आर्वे गावातील ग्रामस्थांच्या पिण्याच्या पाण्याचा व आसपासच्या खेड्यापाड्यातील गुराढोरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होणार आहे. म्हणून संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकान्यांनी याकडे लक्ष देऊन अवैध पाण्याचा उपसा करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

यंदा या परिसरात अत्यंत कमी प्रमाणात पाऊस झाला असल्याने या पाझर तलावात थोड्याफार प्रमाणातच पाणी साचले आहे. मात्र गेल्या अनेक दिवसांपासून अनेक शेतकऱ्यांनी शासनाची कुठलीही परवानगी न घेता या पाझर तलावातून बेसुमार पाण्याचा अवैध उपसा सुरू केला आहे. त्यामुळे भविष्यात या परिसरातील नागरिकांना लवकरच भीषण पाणीटंचाईला सामोरे जाण्याची शक्यता आहे. जर संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लवकरात, लवकर या पाझर तलावातून अवैध पाण्याचा उपसा करणारांवर संबंधित विभागाने कारवाई केली नाही तर आर्वे गावातील ग्रामस्थांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.

ब्रेकिंग बातम्या