पाचोरा येथील पि. जे. रेल्वे सामानाची हलवाहलव सुरू करताच, पि. जे. रेल्वे बचाव कृती समितीने घेतली तात्काळ दखल.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०८/०३/२०२२
पाचोरा येथील पि. जे. रेल्वे स्टेशनच्या परिसरातुन सामानाची हलवाहलव सुरू करण्यात आली असून पि. जे. रेल्वे बचाव कृती समितीने तात्काळ लक्ष देऊन पि.जे.रेल्वेच्या संबंधित सामानातुन साधा खिळा जरी उचलला तरी मज्जाव केला पाहीजे असे मत सर्वसामान्य जनतेतुन व्यक्त केले जात असून पि.जे. पुन्हा सुरु करण्यासाठी जन आंदोलन पुकारले जावे आम्ही सर्व पि.जे. बचाव कृती समिति घ्या पाठीशी आहोत असे मत व्यक्त केले होते.
याची दखल घेत तसेच पि.जे.बद्दल सर्वसामान्य जनतेच्या भावना लक्षात घेऊन पि.जे.रेल्वे बचाव कृती समितीने तात्काळ दखल घेऊन सदरचा सामान ऊचलन्याचे काम थांबवले आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की पाचोरा रेल्वे स्टेशन येथे आज कोणालाही काही माहिती नसतांना भुसावळ येथून काही अधिकारी व कर्मचारी यांनी पि. जे. रेल्वे स्टेशन येथील पि. जे. चे सामान काढण्याचे काम सुरू केले व ते घेऊन जात असतांनाच पि. जे. बचाव कृती समितीने तेथे जाऊन तात्काळ सदर सामान हलवण्याच्या कामास विरोध केला. तसेच जळगाव विभागाचे खासदार श्री. ऊन्मेश दादा पाटील यांच्याशी भ्रमणध्वणीवर संपर्क साधून सदर माहिती त्यांना दिली व त्यांना विनंती केली की हे काम तात्काळ थांबले पाहिजे खासदार श्री. ऊन्मेश दादा पाटील यांनी भुसावळ डी. आर. एम. श्री. केडिया यांच्याशी चर्चा करून सदर काम तात्काळ थांबवण्याचे आदेश दिल्याने पाचोरा येथील सामान ऊचलन्याचे काम बंद झाले आहे.
खासदार या.श्री.उन्मेश दादा पाटील ऐवढ्यावरच थांबले नसून ते येत्या काही दिवसात दिल्ली येथे रेल्वे बोर्ड चेअरमन व जनरल मॅनेजर तसेच रेल्वे राज्यमंत्री मा. श्री. रावसाहेब दानवे यांच्यासोबत पि. जे. बचाव कृती समिती पाचोराची संयुक्त लवकच बैठक घेणार आहेत. तसे पत्र संबंधित व्यक्तींना देण्यात आले आहे. असे मा. श्री. खासदार यांनी कळविले आहे.
पि. जे. रेल्वे स्टेशनवर यावेळी पि जे बचाव कृती समिती अध्यक्ष खलिल दादा देशमुख, कार्याध्यक्ष अँड अविनाश भालेराव, खजिनदार पप्पू राजपूत, प्राध्यापक मनिष बाविस्कर, भरत खंडेलवाल, सुनील शिंदे, संजय जडे, आबा येवले, प्राध्यापक गणेश पाटील, रणजीत पाटील, राजू पाटील, आदी बचाव कृती समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.