मराठा आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी उद्यापासून गाळण बुद्रुक येथे साखळी उपोषण व पुढाऱ्यांना गाव बंदी.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~३०/१०/२०२३

सकल मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे या मागणीसाठी मा. श्री. मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषणाला सुरुवात करत आंदोलन सुरु केले आहे. हे आंदोलन सुरु झाल्यावर संपूर्ण महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण भारतभरातील मराठा समाज बांधवांनी या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे. आता हे आंदोलन मर्यादित राहिले नसून गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत या आंदोलनाला वाढता पाठिंबा मिळत आहे.

या मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यासाठी आता पाचोरा तालुक्यातील गाळण बुद्रुक येथील मराठा बांधवांनी या आंदोलनात उडी घेतली असून उद्या दिनांक ३१ ऑक्टोंबर २०२३ मंगळवार पासून गाळण बुद्रुक येथील श्री. छत्रपती शिवाजी महाराज चौक बसस्थानक परिसरात साखळी उपोषणाला सुरुवात करण्यात येणार असून जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत गाळण बुद्रुक गावात सर्वपक्षीय पदाधिकारी व पुढाऱ्यांना गाव बंदी घालण्यात आली आहे.

उद्यापासून आंदोलनाला सुरुवात करण्यात येणार असल्याने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून मा. प्रांताधिकारी साहेब पाचोरा, मा. तहसीलदार साहेब पाचोरा, मा. डी. वाय. एस. पी. साहेब पाचोरा, मा. पोलीस निरीक्षक साहेब पाचोरा यांना निवेदन देण्यात आले असून या निवेदनावर उपसरपंच श्री. ईश्वर पाटील, श्री. देविदास पाटील, श्री. संतोष पाटील, ॲड. दिपक बोरसे पाटील, श्री. शेखर पाटील, डॉ. भूषण पाटील, श्री. विलास शिंदे, श्री. पृथ्वीराज पाटील, श्री. पिंटू निकम, श्री. सागर पाटील, प्रशांत पाटील, रोहन राजपूत, अक्षय बोरसे, श्री. चेतन पाटील आदी मराठा बांधवांच्या सह्या आहेत.

ब्रेकिंग बातम्या