८ मे रविवार पासून अंबे वडगाव येथे आठवडे बाजाराचा शुभारंभ.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०३/०५/२०२२
पाचोरा तालुक्यातील अंबे वडगाव येथे मागे काही वर्षांपूर्वी आठवडे बाजार भरत होता. परंतु काही अपरिहार्य कारणामुळे प्रत्येक रविवारी भरणारा आठवडे बाजार बंद झाला आहे. हा आठवडे बाजार पुर्वी प्रमाणे पुन्हा सुरु करण्यासाठीचा निर्णय ग्रामपंचायतीच्या माध्यमातून घेण्यात आला असून येत्या ०८ मे २०२२ रविवार पासून या आठवडे बाजाराचा शुभारंभ करण्यात येणार आहे.
कारण अंबे वडगाव हे गाव जामनेर ते पाचोरा या महामार्गावर वसलेले गाव असून या गावालगत कोकडी तांडा, जोगे वडगाव, अंबे वडगाव खुर्द व अंबे वडगाव बुद्रुक ही खेडी आहेत. या पाचही गावांमध्ये शेतकरी वर्ग रहात असून यांना आपल्या दैनंदिन वापराच्या तसेच इतर संसारपयोगी थोड्या, थोड्या वस्तू घेण्यासाठी वरखेडी, शेंदुर्णी किंवा पाचोरा जावे लागते. यातच एखादी वस्तू अत्यावश्यक असल्यास वस्तूंच्या किंमतीपेक्षा प्रवास भाडे जास्त खर्च करावे लागते तसेच हातचं काम सोडून बाहेरगावी जाण्यायेण्याचा वेळ वाया जातो ही सगळी परिस्थिती लक्षात घेऊन या पाचही गावातील जनतेसाठी गावतच आठवडे बाजार भरवून ग्रामस्थांच्या समस्या सोडवण्यासाठी अंबे वडगाव ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी सर्वानुमते महिन्याच्या प्रत्येक रविवारी आठवडे बाजार भरवण्याचा निर्णय घेतला आहे.
म्हणून पंचक्रोशीतील गावातील नागरिकांनी बाहेरगावी आठवडे बाजारासाठी न जाता आपल्या गावातील रविवारी भरणाऱ्या आठवडे बाजारातून आपल्याला हव्या असलेल्या संसारपयोगी वस्तू, किराणा, भाजीपाला खरेदी करुन बाजाराच्या यशस्वीतेसाठी सहकार्य करावे तसेच आपल्या गावातील शेतकऱ्यांनी आपल्याकडे राबत असलेल्या मजुरांना बुधवार किंवा गुरुवारी मजुरीचे पैसे न देता शनिवार किंवा रविवारी मजूरी वाटप करावी म्हणजे मजूरांना रविवार रोजी भरणाऱ्या आठवडे बाजारात देवाणघेवाण करता येईल.