पाचोरा नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी श्रीमती शोभाजी बाविस्कर यांच्यावर केलेल्या आरोपांची सखोल चौकशी व्हावी, पाचोरा मनसे तर्फे मागणी.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२६/०९/२०२३

पाचोरा नगरपरिषदेचे ठेकेदार सिटी वेस्ट मॅनेजमेंट सेल्स अँन्ड सर्व्हिसेस या फर्मने पाचोरा नगरपरिषदेस जंतूनाशके पुरविणे व घंटगाडया दुरुस्ती करणे अशी पुरवठा व सेवेची कामे केलेली असुन ३ एप्रिल २०२३ रोजी एकूण झालेल्या १५ लाख ६ हजार ३०० रुपयांपैकी बिलापोटी ६ लाख रुपये नगरपरिषद प्रशासनाने अदा केलेले होते. परंतु उर्वरीत बिलासाठी गेल्या ५ ते ६ महिन्यांपासून वारंवार नगरपरिषद मुख्याधिकारी शोभाजी बावीस्कर यांना भेटून बिलाची मागणी केली असता अगोदर ३० टक्के प्रमाणे २ लाख ७० हजार रुपये रोखीने लेखाविभागात जमा करा अन्यथा बिल मिळणार नाही. अशी अडवून केली होती. असे आरोप करत केलेल्या कामाची उर्वरित रक्कम मिळवून घेण्यासाठी सुरेश गणसिंग पाटील यांनी पाचोरा येथील मा. प्रांताधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला सुरुवात केली यावेळी त्यांनी मुख्याधिकारी यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले होते. या उपोषणाची सांगता काल मुख्याधिकारी शोभाजी बाविस्कर यांनी उपोषणस्थळी येऊन दोन लाखांचा धनादेश देऊन उर्वरित रक्कम टप्प्यात देण्याचे आश्वासन दिल्यानंतर सुरेश गणसिंग पाटील यांनी ३०% रक्कम मागितल्याचा आरोप कायम ठेवत उपोषण मागे घेतले आहे.

या सुरेश गणसिंग पाटील यांनी केलेल्या आरोपात तथ्य असल्याचे लक्षात घेऊन मुख्याधिकारी श्रीमती शोभाजी बाविस्कर यांच्या कार्यकाळात पाचोरा नगरपरिषदेत जर भ्रष्टाचार झाला असेल तर हा जनतेचा पैसा असल्याकारणाने या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी व्हावी व जर भ्रष्टाचार झाला असेल तर ही रक्कम दोषी असलेल्या संबंधितांकडून वसुल करण्यात यावी यासाठी पाचोरा येथील मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी आज दिनांक २६ सप्टेंबर २०२३ मंगळवार रोजी उपविभागीय अधिकारी मा. श्री. भुषणजी अहिरे यांना निवेदन देऊन पाचोरा नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी श्रीमती शोभाजी बाविस्कर यांची आठ दिवसांच्या आत बदली करुन त्यांची ईडी मार्फत सखोल चौकशी करण्यात यावी अश्या मागणीचे निवेदनात करण्यात आली आहे.

निवेदन देतेवेळी अध्यक्ष शुभम पाटील शहराध्यक्ष ऋषिकेश भोई ताल संघटक जितेंद्र नाईक शहर उपशहराध्यक्ष यश रोकडे व रोहित पाटील सरचिटणीस श्रीकृष्ण दुंदुले संघटक निलेश मराठे विद्यार्थी सेना शहराध्यक्ष हर्षल अहिरे उपशहराध्यक्ष वाल्मीक जगताप रोहित पाथरवट आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

ब्रेकिंग बातम्या