जीवन साहेबराव पाटील हे जारगाव गणातून भाजपातर्फे उमेदवारी लढवणार.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०२/०८/२०२२
पाचोरा तालुक्यातील जिल्हापरिषद व पंचायत समितीचे आरक्षण जाहीर झाल्यापासून राजकीय हालचालींना कमालीचा वेग आला आहे. या निवडणुकीत उमेदवारी लढवण्यासाठी गावागावातून आपापल्या गट व गणातून उमेदवारी लढवण्यासाठी बरेचसे जुने नवे चेहरे समोर येत आहेत. विशेष म्हणजे राज्य सरकारची झालेली उलथापालथ तसेच शिवधनुष्या बाबतचा न्यायालयीन निर्णय अद्यापही जाहीर झालेला नसल्याने ऐनवेळी नेमकं काय घडत या महत्त्वाच्या विषयाकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. तरीही जिल्हापरिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत उमेदवारी लढवण्यासाठी भल्याभल्यांनी आपली पायपिट सुरु केली असून कोणत्या ना कोणत्या कारणाने जनसंपर्कात जावून जनमत जाणून घेत आहेत व प्रसारमाध्यमांचे मार्फत जनतेपर्यंत आपली भुमिका मांडत आहेत.
म्हणून पाचोरा तालुक्यातील वानेगाव येथील मा. श्री. जीवन साहेबराव पाटील यांनी पाचोरा तालुक्यातील नव्यानेच जाहीर झालेल्या जारगाव गणातून भारतीय जनता पार्टीने उमेदवारी दिल्यास ते निवडणुक लढवण्यासाठी इच्छुक आहेत.
वानेगाव येथील जीवन साहेबराव पाटील हे सन १९९८ पासून भारतीय जनता पक्षाचे सक्रिय सदस्य आहेत. तसेच पक्षाने त्यांना सदस्य पदापासून तर जळगाव जिल्हा वैद्यकीय आघाडीच्या सहसंयोजक पदावर नियुक्ती करुन सर्वसामान्य लोकांना वैद्यकीय सेवा मिळवून देण्यासाठी संधी दिली आहे. याच संधीच सोन करत त्यांनी वानेगाव, लोहारी, वरखेडी, राजूरी, गोराडखेडा, पाचोरा व अनेक गावातील गोरगरीब जनतेला जास्तीत, जास्त प्रमाणात शासकीय योजनांचा लाभ मिळवून देत मोफत आरोग्य सुविधा पुरवून या पंचक्रोशीतील गावागावातून वेगळीच ओळख निर्माण केली आहे.
तसेच सत्तेपुढे शहाणपण चालत नाही असे म्हणण्या ऐवजी सत्तेशिवाय शहापण करता येत नाही असे धोरण ठरवून जनतेच्या मुलभूत गरजा व अडीअडचणी सोडविण्यासाठी सत्ता हवी असते जीवन पाटील यांचे मत असून त्यांनी जारगाव गणातून भारतीय जनता पार्टीने आपल्याला उमेदवारी दिल्यास निवडणूक लढविण्यासाठी त्यांनी कंबर कसली असून मी मागील २३ वर्षांपासून भारतीय जनता पार्टीचा सक्रिय सदस्य व पदाधिकारी असल्याकारणाने मला पक्षश्रेष्ठी न्याय देतील अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.