दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०६/१०/२०२३

पाचोरा तालुक्यातील शिंदाड येथून जवळच असलेल्या वाडी (शेवाळे) येथे दिनांक ०२ ऑक्टोंबर २०२३ सोमवार रोजी किरकोळ कारणावरुन एका तरुणाने दोन तरुणांना धक्काबुक्की करत धारदार शस्त्राने वार करुन जबर दुखापत केली होती. या घटनेनंतर जखमी अवस्थेत उपचारादरम्यान अंकुश लोहार याने दिलेल्या फिर्यादीवरुन पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनला दिनांक ०४ ऑक्टोंबर २०२३ बुधवार रोजी एकनाथ तुकाराम खासेराव याच्या विरोधात भा. द. वी. कलम ३२३, ३२४, ३२६, ३४१, ५०४, ५१० या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मा. श्री. महेंद्रजी वाघमारे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल रवी पाटील हे तपास करत असून सद्यस्थितीत आरोपी फरार झाला असल्याने त्याचा कसून शोध सुरु आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की पाचोरा तालुक्यातील वाडी (शेवाळे) येथील रहिवासी अंकुश विश्वनाथ लोहार हे सुतार काम करतात. यांनी गावातीलच एकनाथ तुकाराम कासेराव यांचे दरवाजे खिडक्या बसवून देण्याचे काम घेतले होते. या कामापोटी याच्याकडून १००००/०० रुपये घेतले होते. ठरल्याप्रमाणे अंकुर लोहार याने ९०००/०० रुपयांचे काम केले आहे परंतु ठरलेल्या कामापैकी अंदाजे एक हजार रुपयांचे काम बाकी राहिले असून उर्वरित काम करुन देण्यासाठी अंकुश लोहार तयार होते.

परंतु अशातच अंकुर लोहार हा दिनांक ०२ ऑक्टोंबर २०२३ सोमवार रोजी रात्री नियमितपणे दुकान बंद करुन घरी निघून गेला होता. घरी जाऊन जेवण केल्यानंतर अंकुर लोहार हा लक्ष्मण भिकन पाटील नावाच्या मित्रासोबत वाडी येथील ग्रामपंचायत कार्यालयाजवळ बसून गप्पा करत असतांना याठिकाणी एकनाथ कासेराव याने येऊन माझे राहिलेले काम कधी पूर्ण करुन देतो अशी विचारणा केली तेव्हा अंकुश लोहार याने सांगितले की मी १००००/०० दहा हजार रुपये घेतले आहे पैकी ९०००/०० हजाराचे काम झाले असून उर्वरित काम मी उद्या पूर्ण करुन देतो असे सांगितले परंतु एकनाथ कासेराव याने काहीही ऐकून न घेता वाद घातला तेव्हा तु आता वाद घालु नको सकाळी भेट असे सांगून उगाचच वाद नको म्हणून अंकुश लोहार व त्याचा मित्र हे दुचाकीवरुन पिंप्री सातगाव रस्त्याने घटनास्थळावरुन निघून गेले होते.

हे पाहून एकनाथ कासेराव याने अंकुश लोहारच्या गाडीचा पाठलाग करत रात्री साडेदहा वाजता डोंगरगाव फाट्याजवळ गाडी अडवून त्याठिकाणी पुन्हा वाद घातला व गाडीवरुन खाली उतरुन त्याने अंकुश लोहार याला मारहाण करण्यास सुरुवात केली या वादात लक्ष्मण पाटील याने मध्यस्थी केली मात्र हा ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नसल्याने अंकुश लोहार व त्याच्या मित्राने काढता पाय घेतला याच वेळी याने अचानकपणे त्याच्याजवळ असलेल्या धारदार शस्त्राने अंकुश लोहार याच्या पोटावर वार केला हे पाहून लक्ष्मण पाटील याने गाडी सुरु करत अंकुश लोहार याला गाडीवर बसवून निघून जाण्यासाठी प्रयत्न करत असतांनाच याने याच्या अंगावर धावून जात लक्ष्मण पाटील याच्या पायावार हत्याराने वार केला यात पायाला जबर जखम झाली होती या हल्ल्यात दोघेही रक्तबंबाळ झाले होते. म्हणून उपचारासाठी ते जखमी अवस्थेत पाचोरा येथील खाजगी दवाखान्यात दाखल झाले असून अंकुश लोहार यांच्या पोटावर दोन टाके घालण्यात आले असून पोटात मार लागला असल्याने अन्नपाणी पचत नाही तसेच लक्ष्मण पाटील यांच्या पायावर पाच टाके घालण्यात आले असल्याचे समजते.