पकडा गया वो चोर है, बाकी शिरजोर है. पाचोरा तालुक्यातील इतर गुटखा विक्रेत्यांवर कारवाई कधी ?
पकडा गया वो चोर है, बाकी सब शिरजोर है. चाळीसगाव पोलीसांच्या कारवाईत तारखेडा येथील गोडाऊन मधून लाखो रुपयांचा गुटखा जप्त केला असला तरी आजही नगरदेवळा, भडगाव, शिंदाड, पिंपळगाव हरेश्वर, लोहारा, वरखेडी, नांद्रा या मोठ्या लोकसंख्येच्या गावात मोठ्या प्रमाणात गुटख्याची साठवणूक व विक्री आजही सुरु आहे.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०८/०२/२०२३
पाचोरा तालुक्यातील तारखेडा येथील गुटखा विक्रेत्यावर मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे अन्न व औषध प्रशासन तसेच पोलिसांच्या माध्यमातून दिनांक ०२ फेब्रुवारी २०२३ गुरुवार रोजीच्या सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास कारवाई करण्यात आली असून या कारवाईत तब्बल २६ लाख ८६ हजार ३६८ रुपयांचा अवैधरित्या साठवून ठेवलेला गुटखा जप्त करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की पाचोरा तालुक्यातील तारखेडा येथे एका गोडाऊन मध्ये राज्य शासनाने प्रतिबंधीत केलेल्या गुटख्याचा भलामोठा साठ असल्याची गुप्त माहिती खबऱ्या कडून चाळीसगावचे कर्तव्यदक्ष अधिकारी सहाय्यक पोलीस अधीक्षक मा. श्री. अभयसिंग देशमुख यांना मिळाल्यावर त्यांनी आपल्या खबऱ्या कडून खात्री पटवून घेत पुढील कारवाई करण्यासाठी एक पथक तयार करुन दिनांक ०२ फेब्रुवारी २०२३ गुरुवार रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास पोलिस काॅन्स्टेबल अजय अशोक पाटील, महेश अरविंद बागुल, पोलिस नाईक राजेंद्र अजबराव निकम यांना सोबत घेऊन रात्री ८ वाजेच्या सुमारास तारखेडा गाठले व कोणत्याही दबावाला बळी न पडता कारवाई केली.
या कारवाईत गोडाऊन मालक अनिल काशीनाथ वाणी यांच्या मालकीच्या गोडाऊन मध्ये विमल पान मसाल्याचे प्रत्येकी २०८ पाकिटे भरलेली ४८ पोती प्रत्येक पाकिटात प्रत्येकी ८५००/०० ते ९९००/०० रुपये किंमतीचे २२ पाऊच, व्ही १ टोबॅको नावाच्या तंबाखुच्या ९ गोण्या एका गोणीत ४५० पाकिटे व एका पाकिटात ११ पाऊच एका पाऊचची किंमत २ रुपये, ४ लाख ९९ हजार २०० रुपये किंमतीची राज निवास सुगंधीत पान मसालाचे १३ पोते प्रत्येक पोत्यात २०० पाकिटे व एका पाकिटात ४८ पाऊच एका पाऊचची किंमत ४ रुपये, २ लाख ५४ हजार १०० रुपये किंमतीची व्ही. १ टोबॅको नावाच्या तंबाखुच्या ७ गोण्या एका गोणीत १ हजार ६५० पाकीटे व एका पाकिटात २२ पाऊच एका पाऊचची किंमत १.५ रुपये, ५६ हजार १६० रुपये किंमतीचे सागर पान मसालाचे २ पोते प्रत्येक पोत्यात १३० पाकिटे व एका पाकिटात १२ पाऊच एका पाऊचची किंमत १८ रुपये असा एकुण २६ लाख ८६ हजार ३८६ रुपयांचा अवैधरित्या साठवुन तसेच विक्रीसाठी ठेवलेले राज्य शासनाने प्रतिबंधीत केलेला तंबाखुजन्य गुटखा, पानमसाला पोलिसांनी हस्तगत केला आहे.
याबाबत गोडाऊन मालक अनिल वाणी यांची चौकशी केली असता हे गोडाऊन माझ्या मालकीचे असले तरी हा गुटख्याचा माल दिलीप एकनाथ वाणी व गोकुळ एकनाथ वाणी यांच्या मालकीचा असून मी फक्त विक्री करतो असे सांगितले एका बाजूला कारवाई झाल्याची माहिती मिळताच दिलीप वाणी व गोकुळ वाणी हे फरार झाले आहेत. तसेच अनिल वाणी यांना ताब्यात घेतले असून याप्रकरणी पुढील तपास पाचोरा पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी मा. श्री. प्रतापराव इंगळ यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मा. श्री. जितेंद्र वल्टे योगेश गगणे, करत आहेत.
(पकडा गया वो चोर है, बाकी सब शिरजोर है.)
——————————–
सद्यस्थितीत तारखेडा गावात कारवाई झाली असली तरी आजही पाचोरा शहरात तसेच पाचोरा तालुक्यातील नगरदेवळा, भडगाव, शिंदाड, पिंपळगाव हरेश्वर, लोहारा, वरखेडी, नांद्रा या मोठ्या लोकसंख्येच्या गावात मोठ्या प्रमाणात गुटख्याची साठवणूक व विक्री सुरु असल्याचे खात्रीलायक वृत्त असून या सगळ्या गुटखा विक्रेत्यांचा म्होरक्या तारखेडा व पाचोरा येथील एक प्रतिष्ठित व्यक्ती असल्याचे बोलले जात असून यांच्याकडून अन्न व औषध प्रशासनाला वेळेवर हप्ते पोहचवले जात असल्याने यांच्यावर कारवाई केली जात नसल्याचे जनमानसातून चर्चीले जात असून संबंधित गुटखा किंगचे गल्ली ते दिल्ली कनेक्शन असल्याने कायद्याच्या रक्षकांना इच्छा असुनही कारवाई करता येत नसल्याची चर्चा आहे. ही परिस्थिती पाहता “पकडा गया वो चोर है, बाकी सब शिरजोर है” असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही असे वाटते.