सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • जिल्हा परिषदेकडून दत्त माध्यमिक विद्यालयाला कढलेली नोटीस वादळवाऱ्यात उडाल्याचा संशय.

  • अंबे वडगाव तांडा नंबर दोन येथील महादेव मंदिरावर बाबांचे पुनरागमन, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर.

  • पिंप्री धरणावर अनाधिकृत ताबा घेऊन माती उचल करणाऱ्यांकडून सक्तीने वसूली.

  • पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक पवार यांच्या बदलीसाठी हरीभाऊ पाटील यांचा आंदोलनाचा इशारा.

  • पाचोरा पीपल्स बॅंकेने मुस्ताक पिंजारी यांना दिला पत्ता ठेवून झब्बू, वडिलोपार्जित घराची परस्पर विक्री.

आपलं जळगाव
Home›आपलं जळगाव›कुऱ्हाड बुद्रुक येथील ९५ वर्षाच्या आजीबाईंनी केली कोरोनावर मात.

कुऱ्हाड बुद्रुक येथील ९५ वर्षाच्या आजीबाईंनी केली कोरोनावर मात.

By Satyajeet News
May 1, 2021
859
0
Share:
Post Views: 115
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०१/०५/२०२१

पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड बुद्रुक येथील प्रगतीशील शेतकरी श्री. भगवान हरी पाटील. यांच्या मातोश्री ग.भा.भागीरथीबाई हरी पाटील. वय वर्षे ९५ यांनी योग्य उपचार घेऊन आपल्या इच्छाशक्तीच्या जोरावर कोरोनासारख्या आजाराला पळवून लावत आज ठणठणीत बऱ्या होऊन घरी परतल्या आहेत.

याबाबत सविस्तर वृत्त असे की पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड खुर्द व कुऱ्हाड बुद्रुक गावात कोरोनाची लागण होऊन रुग्णसंख्या झपाट्याने वाढत होती. याच कोरोनाच्या लाटेत कुऱ्हाड बुद्रुक येथील प्रगतीशील शेतकरी श्री. भगवान हरी पाटील. यांच्या घरातही कोरोनाने प्रवेश करत यात भगवान पाटील त्यांच्या धर्मपत्नी, मोठाभाऊ त्यांच्या धर्मपत्नी, नातसुन, नातु व ग.भा.भागरथीबाई यांना कोरोनाची लागण झाल्याचे उघड झाले.

संपूर्ण कुटुंबातील सदस्यांना कोरोनाची लागण झाल्याने काही वेळ सगळ्याच्यांच पायाखालची वाळू सरकली परंतु आपल्या घरातील आजीबाईंनी घाबरून न जाता संपूर्ण परिवाराला आधार देत वेगवेगळ्या दवाखान्यात उपचारासाठी पाठवले यापैकी भगवान पाटील हे जामनेर येथील शासकीय रुग्णालयात उपचार घेऊन कोरोनामुक्त झाले व ९५ वर्षे वयाच्या आजीबाईं जळगाव सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार घेत मागील दोन दिवसापूर्वीच कोरोनाला हरवत ठणठणीत होऊन घरी परतल्या.

कोरोनाची लागण झाल्यानंतर कोणीही घाबरून न जाता योग्यवेळी योग्य उपचारपद्धती व सकस आहार घेतल्यास कोरोना हा आजार परिपूर्ण बरा होऊ शकतो. असा संदेश दिला. जळगाव सिव्हिल हॉटेलमध्ये चांगल्याप्रकारे चोवीस तास उपचार मिळतात तेथील डॉक्टर व त्यांचे सहकारी रात्रंदिवस मेहनत घेऊन मानसिक आधार देतात परकेपणाची जाणीव होऊ देत नाहीत म्हणून औषधोपचारासोबत डॉक्टर व त्यांच्या सहकाऱ्यांनी दिलेला मानसिक आधारामुळे माझ्या मनातील कोरोनाची भीती दुर झाली व मी ठणठणीत होऊन घरी परतली असे आजीबाईंनी सांगितले तसेच उपचारादरम्यान पाचोरा येथील डॉ. विकास केजरीवाल यांच्याकडून औषधोपचार व मार्गदर्शन घेतले होते याचा पूरेपूर फायदा झाल्याचे आजीबाईंनी सांगितले.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Previous Article

लोहारा येथे डॉक्टर सागर दादा गरुड यांच्या ...

Next Article

कोरोना लसीकरण हे प्रत्येकासाठी मिशन व्हावे.(डॉ.राहुल निकम)

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • आपलं जळगाव

    सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सन १९७२ च्या काळातील रस्त्याची ओळख करुन देण्यासाठीचा प्रयत्न सफल.

    July 16, 2023
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा

    November 11, 2020
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    राजपूतसह इतर समाजबांधवांच्याही उन्नतीसाठी एकजुटीने काम करा, श्री राजपूत करणी सेनेच्या खान्देशस्तरिय मेळाव्यात उमटला सूर.

    December 21, 2020
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    माणुसकी समूहातर्फे स्वामी विवेकानंद, व राष्ट्रमाता जिजाऊ यांची जयंती साजरी.

    January 12, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील अवैध धंदे बंद करण्यासाठी मा. श्री. ज्ञानेश्वर अहिरे सरसावले.

    May 31, 2024
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    जळगाव जिल्हा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने पुरग्रस्तांना मदत रवाना.

    July 31, 2021
    By Satyajeet News

You may interested

  • फिल्मी दुनियाफोटो क्लीपराष्ट्रीयसंपादकीय

    ब्रेकिंग न्यूज = पाचोरा तालुक्यातील किराणा दुकानातून थंडी , ताप , सर्दी , खोकला व अंगदुखीच्या औषधी गोळ्यांची अनाधिकृत विक्री

  • ब्रेकिंग न्यूज

    डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे आदिवासी भिल्ल समाजातील नवजात बालकाच्या मृत्यू प्रकरणी उद्या पाचोरा पोलीस स्टेशन समोर आंदोलन.

  • पाचोरा तालुका.

    आले पोलीसांच्या मना तेथे कोणाचे चालेना, पाचोरा शहरासह तालुक्यातील सर्व अवैध धंदे बंद करणार.

दिनदर्शिका

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज