रोजगार सेवकाच्या मानधनावर डोळा, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने टाकला सापळा, चार हजाराची लाच घेतांना वरसाडे प्र.पा.च्या ग्रामसेवकासह सरपंच पती जाळ्यात.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२४/०५/२०२२
सद्यस्थितीत सगळीकडे दिवसाढवळ्या वशिलेबाजी, दलाली, लाचलुचपत घेतल्याशिवाय कामे होत नाहीत. हा प्रकार दिवसेंदिवस वाढत चालला असून या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक हा स्वतंत्र विभाग असून मागील काही महिन्यात तक्रारदारांच्या तक्रारीवरून या विभागामार्फत मोठ्या प्रमाणात कारवाया करण्यात आल्या असून तक्रारी आल्यानंतर अजूनही कारवाई सुरु असली तरी लाच घेणे व लाच देणे थांबता, थांबत नाही. म्हणून एकीकडे कायद्याचा धाक संपला की काय असा प्रश्न उपस्थित केला जात असतांनाच दुसरीकडे जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पाचोरा तालुक्यात लाच घेतांना रंगेहाथ पकडून सापळा यशस्वी करुन कायदा जिवंत असल्याचे पटवून दिले आहे.
अशीच एक घटना आज रोजी पाचोरा तालुक्यातील वरसाडे प्र.पा. ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवक व सरपंच पतीला चार हजारांची लाच घेतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की तक्रारदार हे ग्रामपंचायत वरसाडे प्र.पा. अंतर्गत होणाऱ्या रोजगार हमी योजनेअंतर्गत कामांसाठी मानधन तत्वावर रोजगार सेवक म्हणून काम केले. त्यांचे मिळणारे मानधनाच्या धनादेशावरती सही देण्याच्या मोबदल्यात तक्रारदार यांचेकडे वरसाडे प्र.पा. ग्रामपंचायतीतील ग्रामसेवक काशिनाथ राजधर सोनवणे (वय ५२) यांनी स्वतःसाठी व वरसाडे प्र.पा. ग्रामपंचायतीचे महिला सरपंच यांचे पती शिवदास भुरा राठोड (वय ६७) यांचेसाठी प्रथम पंचासमक्ष ६,००० रुपये लाचेची मागणी करून तडजोडीअंती ४,००० रुपये लाचेची मागणी केली. व सदर लाचेची रक्कम शिवदास राठोड यांचेकडेस देण्यास सांगितल्याने सदर लाचेची रक्कम शिवदास राठोड यांनी स्वतः पंचासमक्ष व काशिनाथ सोनवणे यांच्या समक्ष ग्रामपंचायत वरसाडे प्र.पा. कार्यालयात स्वीकारली असता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने दोघांना रंगेहात पकडुन अटक केली आहे.
रोजगार हमी योजनेअंतर्गत कामांसाठी मानधन तत्वावर रोजगार सेवकाला धनादेशावरती सही देण्याच्या मोबदल्यात ४ हजाराची लाच घेणाऱ्या वरसाडे प्र.पा. ग्रामपंचायतीतील ग्रामसेवक काशिनाथ राजधर सोनवणे (वय ५२), वरसाडे प्र.पा.ग्रामपंचायतीचे महिला सरपंच यांचे पती शिवदास भुरा राठोड (वय ६७) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली आहे.
ही कारवाई मा.श्री.सुनील कडासने सो, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक, मा.श्री.एन.एस.न्याहळदे, साो., अप्पर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक. मा.श्री. सतीश डी.भामरे, साो., वाचक पोलीस उप अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक. यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा पर्यवेक्षण अधिकारी श्री. शशिकांत एस.पाटील, पोलीस उप अधीक्षक, ॲन्टी करप्शन ब्युरो,जळगाव,
तपास अधिकारी श्री.संजोग के.बच्छाव , पोलीस निरीक्षक, अँन्टी करप्शन ब्युरो, जळगाव. तसेच डी.वाय.एस.पी. श्री.शशिकांत एस.पाटील, पोलीस इन्स्पेक्टर संजोग बच्छाव, पोलीस इन्स्पेक्टर एन.एन.जाधव सहाय्यक फौजदार दिनेशसिंग पाटील, सहाय्यक फौजदार सुरेश पाटील, पो.हे.कॉ.अशोक अहीरे, पो.हे.कॉ.सुनिल पाटील, पो.हे.कॉ.रविंद्र घुगे, म.पो.हे.कॉ. शैला धनगर, पो.ना.मनोज जोशी, पो.ना.जनार्धन चौधरी, पो.ना.सुनिल शिरसाठ, पो.कॉ.प्रविण पाटील, पो.कॉ.महेश सोमवंशी, पो.कॉ.नासिर देशमुख, पो.कॉ.ईश्वर धनगर पो.कॉ.प्रदिप पोळ. या पथकाने यशस्वीपणे पार पाडली.
——————————————–
सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधावा.
अँन्टी करप्शन ब्युरो,जळगाव. अल्पबचत भवन, जिल्हाधिकारी कार्यालय आवार, जळगांव
दुरध्वनी क्रं. ०२५७/२२३५४७७
मोबा.क्रं. ८७६६४१२५२९
टोल फ्रि क्रं. १०६४